Just another WordPress site

EPF मध्ये नॉमिनेशन नसले तरीही करता येतो कुटूंबाला करतो येतो पैशांवर क्लेम, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?

कर्मचाऱ्यांसाठी नोकरीच्या ठिकाणी बेसिक पगाराच्या १२ टक्के रक्कम ही EPFO खात्यात जमा केली जाते. आता EPFO ने PF खातेधारकाला नॉमिनी निवडणं बंधनकारक केलं. कारण, नॉमिनी असल्यावर ईपीएफ क्लेम करून पैसे काढणं अधिक सोपं होतं. नॉमिनीला पैसे मिळण्यास कोणतीही अडचण येत नाही. मात्र, जर नॉमिनी नसेल तर तुमचे पैसे मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र, एखाद्याने नॉमिनेशन केलं नसेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबीय त्याचे पैसे काढू शकत नाहीत, असंही नाही. जर पीएफ खातेधारकाचा नॉमिनी न करताच मृत्यू झाला, तर जवळचे नातेवाईक पीएफ पैशावर क्लेम करू शकतात. यासाठी नेमकी प्रक्रिया काय याच विषयी जाणून घेऊ.

पैसा मिळवण्यासाठी माणसं आयुष्यभर मेहनत करतात. एक- एक रुपया वाचवून सर्वसामान्य लोक पैशांची बचत करत असतात. कुणी नोकरीकरतो, कुणी स्वत:चा व्यवसाय करतो, पण पैसे मिळवण्यासाठी दोघांनाही कष्ट करावे लागतात. त्याचबरोबर लोक जे पैसे कमावतात, ते त्यांच्या ठेवी बँकेत ठेवतात. तर नोकरी करणाऱ्यांचे पीएफअकाउंट असते. पीएफ अकाऊंट तुमच्या रिटायरमेंटवेळी खूप उपयोगी ठरतं. दरम्यान, पीएफ अकाऊंटमध्ये नॉमिनी असणं खूप गरजेचं आहे. दुर्दैवाने पीएफ अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाला तर त्या पैशांचा कायदेशीरित्या हक्क नॉमिनीकडे असतो. त्यामुळं पीएफ खातेदार आणि त्याच्या कुटुंबाला पीएफ फायदे मिळवून देण्यासाठी ई-नामांकन खूप गरजेचं आहे. कारण, जर एखाद्या पीएफ ग्राहकाचा मृत्यू झाला तर ई-नॉमिनेशन केल्यावरच भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, विम्याचे फायदे मिळणं शक्य असतं. मात्र, जर नॉमिनी नसेल आणि ईपीएफ खातेधारकाचा मृत्यू झाला तर पैसे कोणाला मिळणार ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ‘ईपीएफओ’चा नियम आहे की, जर ग्राहकाने नॉमिनेशन केले नसेल आणि त्याचा मृत्यू झाला असेल तर ईपीएफमध्ये जमा झालेले पैसे कुटुंबातील सदस्यांमध्ये समान प्रमाणात वाटले जातात. मात्र, हे पैसे मिळवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना फॉर्म २० भरावा लागतो. या फॉर्मध्ये पैसे मिळण्याचा हक्क असलेल्या कुटुंबातील सदस्यांची नावं द्यायची असतात. ज्या कंपनीत ईपीएफ ग्राहक काम करायचा त्या कंपनीकडून कुटुंबातील सदस्यांची माहिती दिली जाते. जर काही कारणास्तव कंपनी ही माहिती देऊ शकत नसेल तर कुटुंबातील सदस्यांची यादी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून सादर करावी लागेल. या फॉर्म बरोबरच मृत्यूपत्राची फोटोकॉपी, जो नॉमिनी आहे त्यांच्या आधार कार्डची प्रत, आणि रद्द झालेला चेकही जोडावा लागतो.

ईपीएफओकडे फॉर्म जितक्या लवकर सबमिट केला जाईल तितक्या लवकर ते पैसे मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होते. साधारणपणे, EPF कमिशनर फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत क्लेम निकाली काढतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्याने हक्क सांगण्यास उशीर करू नये. दरम्यान, जर ग्राहकाने इच्छापत्र केले असेल, तर प्रक्रियेस थोडा वेळ लागू शकतो. कारण मृत्यूपत्राच्या दावेदारांना इच्छापत्राचे उत्तराधिकार प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले जातं. भविष्यात असा क्लेम कुणी करू नये यासाठी खबरदारी घेतली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!