Just another WordPress site

रेल्वे तयार करायला किती खर्च येतो माहितीये का? नुसत्या एका डब्याच्या खर्चात आलिशान बंगला बांधून होईल!

भारतीय रेल्वे हा वाहतुकीचा एक चमत्कार आहे. रेल्वेचे अफाट जाळे पाहिले की थक्क व्हायला होते. आजही देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे रेल्वेचा पर्याय उपलब्ध असतो लोकांचे प्रवासासाठीचे पहिले प्राधान्य भारतीय रेल्वे हेच असते. त्यामुळेच भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानली जाते. देशात दररोज लाखो प्रवासी रेल्वेच्या सेवेचा लाभ घेतात. फार थोडे लोक असे असतील ज्यांनी रेल्वेने प्रवास केला नसेल. रेल्वेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन आहेत. तसेच रेल्वेच्या वेगवेगळ्या श्रेणींचे डबे असतात. त्यामुळे ट्रेनचा प्रकार आणि डब्याची श्रेणी यानुसार भाडे आकारले जाते. मात्र ज्या डब्यातून आपण आरामात आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचतो त्या एका डब्याच्या बांधणीसाठी किती खर्च येत असेल याची तुम्हाला काही कल्पना आहे का? रेल्वेचे सर्व काम उत्तम दर्जाचे आणि भक्कम बांधणीचे असते. ते जास्तीत जास्त ठिकावे या हेतूने केलेले असते. रेल्वेचा एक डबा बनवण्यासाठी किती खर्च येतो हे तुम्ही ऐकलेत तर थक्कच व्हाल. त्या खर्चात एखादे आलिशान घर बांधून होईल.

 

रेल्वेचे काम उच्च दर्जाचे

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखात असते. एकेका डब्यात कित्येक वेळा शेकडो लोक प्रवास करतात. शिवाय स्लीपर, एसी, फर्स्ट क्लास अशा विविध श्रेणींसाठी काही खास सुविधा रेल्वेकडून पुरवल्या जातात. त्यामुळं सामान्य डब्याला बनवायला देखील रेल्वेला जवळपास दोन कोटी रुपयांचा खर्च येतो. बसला की नाही धक्का. आता तुम्ही म्हणाल एवढ्या पैशात तर आलिशान घर बांधून होईल.

 

एका डब्याची किंमत

रेल्वेचे काम वरकणी दिसते तेवढे सोपे नसते. यात अनेक तांत्रिक बाबी गुंतलेल्या असतात. एका ट्रेनमध्ये विविध श्रेणीच्या डब्यांबरोबरच महत्त्वाचे असते ते रेल्वे इंजिन. एक साधारण डबा किंवा रेल्वे बोगी बनवण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च केले जातात. तर एका माहितीनुसार भारतीय रेल्वेचे इंजिन बनवण्यासाठी २० कोटी रुपयांहून अधिक खर्च येतो. भारतीय रेल्वेची इंजिने भारतातच बनवली जातात, त्यामुळे त्यांची किंमत तुलनेने खूप कमी आहे. ट्रेनची एक बोगी बनवण्यासाठी २ कोटींहून अधिक खर्च येतो. अर्थात ही सर्वसाधारण आकडेवारी आहे. श्रेणी किंवा वर्गानुसार रेल्वेच्या डब्याच्या बांधणीचा खर्च बदलतो.

 

संपूर्ण ट्रेनची किंमत

एका सर्वसाधारण ट्रेनला बनवण्यासाठी भारतीय रेल्वेला तब्बल ५० ते १०० कोटी खर्च येतो. एक्स्प्रेस ट्रेनबद्दल बोलायचे तर त्यात एकूण २४ डबे असतात. म्हणजेच प्रत्येक बोगीचा खर्च २ कोटी रुपये धरल्यास त्या ट्रेनच्या डब्यांना बनवण्यासाठीचा एकूण खर्च जवळपास ४८ कोटी रुपये होतो. अजून त्यात इंजिनाचा खर्च बाकी आहे. त्यात २० कोटींच्या इंजिनची किंमत जोडल्यानंतर एक्स्प्रेस ट्रेनची किंमत ६८ कोटी रुपयांवर पोचते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!