Just another WordPress site

मान्सून दाखल होऊनही विदर्भात पेरण्या खोळंबलेल्याच, पेरणीसाठी जमिनीत आवश्यक ओलावा नाही

नागपूर : विदर्भात मोसमी पावसाचे आगमन (Arrival of Monsoon) झाले असले, तरी पेरणीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत निर्माण न झाल्याने शेतकऱ्यांना आणखी काही दिवस पेरणीसाठी (sowing) थांबावे लागणार आहे. जोपर्यंत १०० मिलीमीटर पावसाची नोंद होऊन जमिनीत पुरेशी ओल तयार होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असा सल्ला कृषी खात्याने (Department of Agriculture) दिला आहे. (Despite the arrival of monsoon, sowing in Vidarbha has been delayed, the soil does not have the necessary moisture for sowing)

दोन दिवसांपूर्वी विदर्भात मान्सून दाखल झाला, काही ठिकाणी पावसाच्या सरीही आल्या. पण दुसऱ्याच दिवशी त्याने उसंतही घेतली. विदर्भात १ जून ते २५ जूनपर्यंत नागपूर विभागात २५.७ मि.मी. तर अमरावती विभागात केवळ २६.२ मिमी पावसाची नोंद झाली. जमिनीत ओलावा तयार न झाल्याने पेरण्या केल्या तर उलटण्याचा धोका असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी अद्याप पेरण्यांना सुरुवात केली नाही. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, त्यांनी मर्यादित स्वरूपात पेरण्या केल्या. मात्र त्याचे प्रमाण अत्यंत अल्प म्हणजे १ ते ३ टक्के इतकेच आहे.

दरम्यान, पुरेसा पाऊन न झाल्याने  पेरण्यांची लगबग सुरू झाली नाही. बियाणे, खते खरेदी शेतकऱ्यांनी यापूर्वीच करून ठेवली असल्याने बाजार स्थिर आहे. दरम्यान सरासरी १०० मि.मी. पाऊस झाल्यावरच पेरण्या करा, असा सल्ला नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!