Just another WordPress site

Cotton Boll Worm : विदर्भात कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला, लागवडीचा खर्चही निघणं अवघड

खरीप हंगामातील कापसावर  बोंडअळीचा प्रादूर्भाव वाढला असून, सुमारे ४० टक्के क्षेत्रावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याचा अंदाज आहे.  चार ते पाच वर्षांपूर्वी आलेल्या बोंड अळीचे संकट पुढील काळात कमी करण्यात यश आले. मात्र, यंदा पुन्हा ही बोंड अळी ठिकठिकाणी डोके वर काढू लागली. कापसावरील बोंडअळीच्या हल्ल्याने लागवडीसाठी केलेला खर्चही निघणे कठीण झालं. 



महत्वाच्या बाबी 

१. बोंडअळीचं हल्ल्याने कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान

२. कपाशीच्या पिकावरील प्रादुर्भावउत्पादन घटीसाठी कारणीभूत

३. एकरभर कापसासाठी साधारण१५ ते २० हजार खर्च 

४. लागवड खर्चही निघणं कठीण झाल्यानं शेतकरी हवालदिल 

सातत्याने अडचणीत असलेला शेतकरी यंदा कापसावरील बोंडअळीच्या हल्ल्याने कोलमडला आहे. यंदा बऱ्यापैकी पाऊस झाल्याने कापूस पेरण्यात आला. एकरी १० ते १५ क्विंटल उत्पादन होईल, असा शेतकऱ्याला अंदाज होता; मात्र, बोंडअळीने गणित बिघडवले. बोंडअळीला आतापर्यंत पोषक वातावरण मिळाल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालंय.   यंदा खरिपातील पेरणी होताच अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.  सध्या कृषी विभागाकडून पिकांची पाहणी आणि पंचनामे सुरु आहेत. त्यामुळे खरिपातील किती पिकांचे नुकसान झालं, याची आकडेवारी दिवसागणिस समोर येतेय.आतापर्यंत  सलग पावसामुळे जिल्ह्यात सुमारे ९० हजार हेक्टरपर्यंत पिके बाधित झालेली आहेत. आता पिकांवर किडींचाही प्रादुर्भाव वाढल्याचा परिणाम दिसू लागला. यात प्रामुख्याने कपाशीच्या उत्पादनात घटीची शक्यता वर्तवली जात आहे. कपाशी पिकावर अकोट, बार्शीटाकळी, अकोला तालुक्यात काही ठिकाणी कृषी तज्ज्ञांनाही अवशेष मिळून आले.  प्रामुख्याने जिनिंग प्रेसिंग असलेल्या शिवारात बोंडअळी आढळून आलेली आहे. प्रशासनाने या हंगामात एक जूननंतर कपाशी पेरणीचे आदेश काढले होते. शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी हे आदेश पाळत जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली. आता पीक अडीच महिने कालावधीचे झाले.  कपाशीमध्ये अनेक ठिकाणी फूल, पात्या उगवल्या.फुलांमध्ये डोमकळ्या आढळत आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यातील कपाशीवर हा प्रादुर्भाव अधिक आहे. ज्यांनी फरदड घेतली अशा शेतांमध्येही बोंडअळी आढळत आहे. या किडीसाठी पोषक असलेले वातावरण सध्या आहे. गेले काही दिवस पिकांना सूर्यप्रकाश मिळालेला नाही. सातत्याने ढगाळ वातावरण असल्याने किडी फोफावत आहेत. कपाशीच्या पिकावर आता झालेला प्रादुर्भाव हा उत्पादन घटीसाठी प्रमुख कारणीभूत ठरू शकतो.  दरम्यान, एका एकर कापसासाठी साधारणपणे १५ ते २० हजार खर्च येतो. तो निघणेही कठीण झाल्यानं कुटूंबाची गुजराण आता कशी करायची असा प्रश्न  शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!