Just another WordPress site

पेले यांना कोलन कॅन्सर! कोलन कॅन्सर म्हणजे काय? ‘या’ किरकोळ लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

सध्या केवळ फुटबॉलप्रेमींमध्येच नाही, तर जगभरातील सर्वसामान्यांमध्येही ब्राझीलचा दिग्गज खेळाडू पेले यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे वातावरण आहे. पेले यांची प्रकृती कोलन कॅन्सरमुळे खालावली. मीडिया रिपोर्ट्नुसार त्यांच्यावर कीमोथेरपी झाली. मात्र त्यांच्या प्रकृतीवर त्याचा पुरेसा परिणाम दिसून आला नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली असून त्यांच्या शरीराचे अनेक अवयव निकामी झालेत. दरम्यान, कोलन कॅन्सरी आहेत तरी काय? त्याची लक्षणं काय? याच विषयी जाणून घेऊ.

कोलन कॅन्सर म्हणजे काय?

गेल्या काही काळापासून नागरिकांमध्ये कोलन कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. हा जगभरातील तिसरा सर्वात जास्त होणारा कॅन्सर आहे. कोलन कॅन्सरला मराठीत मोठ्या आतड्याचा कॅन्सर म्हणतात. खराब आहार हे कोलन कॅन्सरचं सर्वात मोठं कारण मानलं जातं. बऱ्याचदा काही माणसं पोटदुखी कितीही असली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात, मात्र पोटदुखीकडे दुर्लक्ष करणे हे कधी कधी अंगलट येऊ शकते. आणि पोटामधील समस्या दीर्घकाळ राहिली तर त्याचा परिणाम कोलन कॅन्सरसारखा रोग होऊ शकतो.
पेले यांनाही हाच आतड्याचा कॅन्सर आहे. मोठ्या आतड्याला कोलन म्हणतात. कोलन गुदाशय किंवा गुदद्वाराशी जोडते. कोलन आणि गुदाशय मोठे आतडे तयार करतात आणि ते पाचन तंत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोलन कॅन्सर हा गुदाशयाच्या आतील भागात सुरू होतो त्याला पॉलीप म्हणतात. जेव्हा पॉलीपमध्ये कॅन्सर होतो, तेव्हा त्याचा हळूहळू गुदाशयाच्या भिंतीवर परिणाम होऊ लागतो. गुदाशयाच्या भिंती अनेक थरांनी बनलेल्या असतात. कोलन कॅन्सर सर्वात आतील थरापासून सुरू होतो आणि नंतर तो दुसऱ्या थरात पसरतो. त्यानंतर ते शरीराच्या इतर अवयवांमध्येही पसरू लागतो.

तरुणांमध्ये कोलन कॅन्सरचे प्रमाण जास्त

सध्या तरुणांमध्ये कोलन कॅन्सरची समस्या वेगानं वाढतेय. जगभरात प्रोस्टेट आणि लंग्स कॅन्सरनंतर पुरूषांमध्ये जास्तीत जास्त संख्येत कोलन कॅन्सरचे रुग्ण आढळतात. यात २० ते ४० वयोगटातील तरूणांची संख्या जास्त आहे. हा कोलन कॅन्सर हा रोग ४५ वर्षानंतर होण्याची जास्त शक्यता असते, मात्र आता कोरोनाच्या महामारीमुळे ३५ वर्षापर्यंतच्या व्यक्तींनाही हा कॅन्सर होण्याची भीती आता वाढू लागलीये. ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत तरुण लोकांमध्ये हा कॅन्सर झाला तर त्याच्यावर उपचार करणे खपू कठीण आहे.

काय आहेत कोलन कॅन्सर होण्याची कारणं?

तंबाखूचे सेवन, मद्यपान आणि प्रक्रिया केलेले मांस ही कोलन कॅन्सर होण्याची कारणं आहेत. याशिवाय, तंतूमय पदार्थांचे प्रमाण अत्यल्प असलेल्या पदार्थांचा आहारात होणार अतिरेक, लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव ही देखील कोलन कॅन्सर जडण्याची काही सर्वसाधारण कारणं आहेत.

कोलन कॅन्सरची लक्षणं काय?

थकवा, मळमळ, चक्कर येणं, तहान लागणं, पोट खराब होणं ही कोलन कॅन्सरची लक्षणं आहेत. याशिवाय, छातीत जळजळ, उलट्या होणं, बद्धकोष्ठता, भूक न लागणं, चिडचिड आणि गोंधळ, सतत ओटीपोटात वेदना होणं, वजन कमी होणं ही देखील कोलन कॅन्सची लक्षणं आहेत.

कोलन कॅन्सरचा भारतातील प्रादुर्भाव

कोलन कॅन्सरच्या रुग्णांमध्ये दरवर्षी दहा लाखांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत असते. भारतामध्ये दरवर्षी कोलन कॅन्सरच्या ५० हजार नव्या प्रकरणांचे निदान होते आणि हा आकडा वर्षाकाठी २० टक्के इतक्या भयावह वेगाने वाढत आहे. पुरुष आणि स्त्रियांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचे प्रमाण हे दर १ लाख व्यक्तींमागे ४.४ आणि ३.९ टक्के इतके आहे.

कोलन कॅन्सरसाठी प्रतिबंधात्मक उपाय काय?

आपल्या पोटाचे विकार वाढू लागतात त्याचे मूळ कारण असते आपण घेत असलेला चुकीचा आहार. त्यामुळे कोलन कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर तुम्ही तुमच्या आहाराची काळीज गांभीर्याने घेतली गेली पाहिजे. तुम्ही घेत असलेल्या आहारात साखर, मीठ आणि मैद्याचा वापर कमी करा. तुम्ही सतत जंक फूड आणि मसालेदार पदार्थ खात असाल ते वर्ज्य करा. फळे, हिरव्या भाज्या आणि सर्व प्रकारची व्हिटॅमिन तुमच्या आहारात कशी समाविष्ठ करत असाल ते नक्कीच फायदेशीर होईल. दारु आणि धुम्रपान करत असाल तर तेही टाळा, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही रोज व्यायाम करा.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!