Just another WordPress site

एक-दोन नाही तर तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालकीण होती अभिनेत्री तुनिषा शर्मा

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्मानं वसईत एका मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडलीये. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी अभिनेत्रीनं हे टोकाचं पाऊल उचलल्यानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. इतक्या कमी वयात आपल्या अभिनयाच्या बळावर मालिका आणि चित्रपट विश्वात आपली हक्काची जागा निर्माण करणारी अभिनेत्री जग सोडून गेल्याने अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जातेय. तुनिषानं २० व्या वर्षी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत चांगली कमाई केली होती.

तुनिषा शर्मा अलिबाबा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत होती. याच मालिकेच्या सेटवर तिने आपलं आयुष्य संपवलं. येत्या ४ जानेवारी रोजी अभिनेत्री तुनिषा शर्मा आपला वाढदिवस साजरा करणार होती. मात्र, त्या आधीच तिने आपल्या आयुष्याचा शेवट केला. तुनिषानं आत्महत्या का केली, यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तुनिषाचा जन्म चंदीगडमध्ये झाला होता. तिचं शालेय शिक्षण देखील चंदीगडमध्येच झालं. तुनिषाला लहानपणापासूनच अभियानाची आणि डान्सची खूप आवड होती. तिनं आपलं करिअर याच क्षेत्रात करायचं ठरवलं होतं. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ती मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर तुनिषाने नाव तर कमावलंच, पण भरपूर संपत्तीही कमावली.
तुनिषाने इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून तिचा अभिनय प्रवास सुरू केला होता. अवघ्या १४ व्या वर्षी तुनिषाने ‘भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केलं. तेव्हापासून आतापर्यंत ती अनेक लोकप्रिय शोमध्ये झळकली. तुनिषानं ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’, ‘गब्बर पुंचवाला’, ‘भारत का वीर पुत्र-महाराणा प्रताप’, ‘इंटरनेट वाला लव्ह’ आणि ‘इश्क सुभानल्लाह’ या टीव्ही मालिकांमध्येही काम केलं. केवळ छोट्या पडद्यावरच नाही तर चित्रपटांमध्येही तिने आपलं नशीब आजमावलं. तुनिषा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २’, ‘दबंग ३’ या बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली होती. कतरिना कैफच्या ‘फितूर’ सिनेमातीही कतरिनाच्या बालपणीची भूमिका साकारून तुनिषाने खूप वाहवा मिळवली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्पावधीतच यशाची शिखरे गाठणारी तुनिषा शर्मा तिच्या स्वत:च्या आलिशान घराची मालकिन होती. तुनिषाच्या घराची किंमत करोडोंमध्ये असल्याचे सांगण्यात येतंय. आलिशान घरासोबतच तुनिषा शर्मा अनेक आलिशान गाड्यांचीही मालकीण होती. तुनिषा तब्बल २ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे १५ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण होती. वयाच्या २०व्या वर्षात तिने मिळवलेले हे यश वाखाणण्याजोगे होते.
दरम्यान, तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यावर तिची आईने शिजान खानवर अतिशय गंभीर आरोप केले. तुनिषाच्या आईनं सांगितलं की, शिजान आणि तुनिषा रिलेशनशीपमध्ये होते. शिजाननेच आपल्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं होतं. तुनिषाच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर शिजान खान याला अटक करण्यात आली असून, त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. दरम्यान, या तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात आता काय समोर येतं हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!