Just another WordPress site

सरकारी नोकरी शोधताय? प्रगत संगणन विकास केंद्रात सुरूये ५३० पदांची मेगा भरती, पाहा काय आहे शेवटची तारिख

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. अनेकांची पगारकपात झाली आहे तर काहींकडे नोकरी असून पगार मिळत नाही आहे. त्यामुळं अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच ‘लोकहित वार्ता’ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. सध्या प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये (CDAC) विविध पदांच्या एकूण ५३० जागांसाठी भरती होत आहे.

 

पहिली पोस्ट – प्रोजेक्ट असोसिएट

शैक्षणिक पात्रता – B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D

एकूण जागा – ३०

वयोमर्यादा – ३० ते ५६ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबर २०२२
तपशील – www.cdac.in

दुसरी पोस्ट – प्रोजेक्ट इंजिनिअर

शैक्षणिक पात्रता – B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D., ४ वर्षांचा अनुभव

एकूण जागा – २५०

वयोमर्यादा – ३० ते ५६ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबर २०२२

तपशील – www.cdac.in

तिसरी पोस्ट- प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्रॅम डिलिवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर

शैक्षणिक पात्रता – B.E/ B.Tech किंवा 60% गुणांसह सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D., ९ ते 15 वर्षांचा अनुभव

एकूण जागा – ५०

वयोमर्यादा – ३० ते ५६ वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबर २०२२

तपशील – www.cdac.in

चौथी पोस्ट – सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर /मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड

शैक्षणिक पात्रता – B.E/ B.Tech किंवा सायन्स/कम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D., 3 ते 7 वर्षांचा अनुभव

एकूण जागा – २००

वयोमर्यादा – ३० ते ५६ वर्ष

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबर 2022

तपशील – www.cdac.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा.Current Job Opportunities मध्ये know more वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

 

 

इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक

पोस्ट – वेलफेअर ऑफिसर

शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम, मराठी भाषेचं ज्ञान, २ वर्षांचा अनुभव

एकूण जागा – १

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑक्टोबर २०२२

अधिकृत वेबसाईट – www.ispnasik.spmcil.com

पोस्ट – ज्युनियर ऑफिस असिस्टंट

शैक्षणिक पात्रता – पदवीधर, संगणकाचं ज्ञान, टायपिंग इंग्रजी ४० श.प्र.मि. आणि हिंदी ३०, ४० श.प्र.मि. वेग

एकूण जागा – १५

वयोमर्यादा – १८ ते ३० वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

नोकरीचं ठिकाण – नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑक्टोबर २०२२

अधिकृत वेबसाईट – www.ispnasik.spmcil.com

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!