Just another WordPress site

गुगलवर ‘या’ गोष्टी सर्च करण्याचा मोह टाळ भावा, नाहीतर खावी लागेल तुरुंगाची हवा

आज आपल्या दैनंदिन जीवनाचा गुगल हा एक महत्त्वाचा भाग बनलाय. अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींविषयी जाणून घेण्यासाठी आपण गुगलवर सर्च करत असतो. कारण, गुगलवर अवघ्या काही सेकंदात जगभरातील सर्वच गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. औषधांपासून ते रेसिपीपर्यंत प्रत्येक गोष्टीच्या माहितीसाठी एकमेव मार्ग म्हणजे Google. या गुगलने तंत्रज्ञानाची कवाडे खुली करत, अनेक कठीण वाटणाऱ्या गोष्टी सोप्या केल्यात. मात्र, सर्च इंजिन असलेल्या गुगलचा वापर जपून केला नाही तर ते धोक्याचं ठरू शकतं. गुगलवर अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्च केल्यास तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. जाणून घेऊया, कोणत्या गोष्टी Google वर शोधल्यास तुम्हाला महागात पडू शकतं.

गुगल सर्च इंजिन म्हणजे माहितीचा खनिजा आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर, रस्ता, कोणत्याही गोष्टीची माहिती गुगलवर मिळते. थोडक्यात काय तर गुगलवर आपण जगातील काहीही सर्च केलं तर गुगल त्यावर आपल्याला उत्तर देत. आपण जगात कुठेही बसून कुठलीही माहिती फक्त एका क्लिकवर मिळवू शकतो. पण सर्च करण्यापूर्वी तुम्ही काय सर्च करताय, याचा कधी विचार करता का? गुगलवर काहीही सर्च करण्यापूर्वी काय सर्च करावं आणि काय नाही. हे ठाऊक असणं गरजेचं आहे. अन्यथा काही गोष्टी Google Search करणं हे अडचणीचं ठरू शकतं.

चाइल्ड पॉर्नोग्राफी

चाइल्ड पॉर्नोग्राफी हा अतिशय संवेदनशील विषय आहे. सरकार चाइल्ड पोर्नोग्राफीच्या विरोधात आहे. आपल्या देशात चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत खूप कडक कायदे आहे. पॉक्सो कायद्याच्या कलम १४ अंतर्गत गुगलवर चाइल्ड पोर्न सर्च करणं, पाहणं किंवा शेअर करणं गंभीर गुन्हा आहे. चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत गुगलवर सर्च केल्यास ५ ते ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे चाइल्ड पोर्नबाबत कधीही गुगलवर सर्च करू नये.

बॉम्ब बनविण्याची पद्धत

अनेकदा लोक गुगलवर अनावश्यक गोष्टी सर्च करतात. आजची युवापिढी तर गुगलवर काय काय सर्च करेल हे सांगणे अवघड आहे. काही लोक गुगलवर अशाही गोष्टी सर्च करतात, ज्या सर्च करणं चांगलंच महागात पडू शकतं. सायबर सेलच्या नजरेतून असं सर्च करणारे युजर्स वाचू शकत नाही. बॉम्ब बनवणं अशा गोष्टी सर्च केल्यानंतर त्या अलर्ट मोडमध्ये जातात. यामुळे कारवाई झाल्यास थेट जेलमध्ये जावं लागू शकतं.

पीडितेचे नाव

कौटुंबिक हिंसाचार अथवा अत्याचार प्रकरणातील पीडितेचे नाव हे लपवून ठेवलं जाते. मात्र, अशी अनेक लोक असतात, जे गुगलवर या पिडीत लोकांची फोटो आणि नाव शोधत असतात आणि ही माहिती मिळताच ते ऑनलाईन पोस्ट देखील टाकत असतात. मात्र अशा लोकांवर पोलिसांची नजर पडल्यास त्यांच्यावर थेट कारवाई होऊ शकते. त्यामुळं पीडित महिलेचे नाव, फोटो आणि इतर माहिती सोशल मीडियावर शेअर करणं टाळावं.

चित्रपट पायरसी

नवा एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज आली की लगेच ती फुकटात पाहण्यासाठी अनेकजण धडपड करतात. एखादा चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी अनेक वेबसाईटवर सर्च केल्या जातं. पण, तुम्हाला माहिती आहे का चित्रपट पायरसी हा गुन्हा आहे. त्यामुळे गुगलवर चित्रपटाचे पायरेटिंग संबंधित काहीही शोध घेतल्यास, तुरुंगवास होऊ शकतो. तसेच, तुम्हाला दंड देखील होऊ शकतो. चित्रपट रिलीज होण्याआधीच ऑनलाइन लीक केल्यास ३ वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड होऊ शकतो.

गर्भपात कसा करायचा?

गुगलवर गर्भपाताच्या पद्धती शोधणे देखील गुन्हा मानला जाऊ शकतो. कायद्यानुसार, गर्भपात करता येत नाही. म्हणूनच गुगलवर गर्भपात कसा करायचा, हे शोधणं टाळा

हॅक करण्याची पद्धत

जर तुम्ही गुगल सर्चवर हॅक कसं करायचं किंवा त्याबद्दल पुन्हा पुन्हा सर्च केले तर तुमच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळं हॅक करण्याची पद्धत गुगलवर शोधणं टाळा. अन्यथा तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते.

हिंसेसंदर्भात सर्च केल्यास

गुगल सर्चमध्ये तुम्ही हिंसेशी संबंधित सतत सर्च केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. अशा गोष्टी वारंवार सर्च करणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!