Just another WordPress site

आश्चर्यकारक! व्हेल माशाची उलटी विकून मालामाल व्हाल, उलटी १ ते २ कोटी रुपये प्रति किलो

जगात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या खूप दुर्मिळ असतात आणि या दुर्मिळ वस्तूंची किंमतही गगनाला भिडणारी असते. तुम्ही कधी एखाद्या जनावराने केलेली उलटी विकताना लोकांना पाहिलंय का? नसेल. मात्र, बाजारात एका प्राण्याची उलटी ही कोटी रुपयांमध्ये विकली जाते. याच प्राण्याबद्दल जाणून घेऊया.

 

महत्वाच्या बाबी

१. युपीमध्ये ‘एम्बरग्रीस’ तस्कर पोलिसांच्या जाळ्यात
२. १० कोटी किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त
३. व्हेलच्या उलटीची किंमत सोन्या-हिऱ्यांपेक्षा जास्त
४. व्हेल माशाची उलटी १ ते २ कोटी रुपये प्रति किलो

 

उत्तर प्रदेश पोलिसांच्या टीमने एका छाप्या दरम्यान व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक केली. व्हेल प्रजातीचे अनेक मासे समुद्रात आढळत असले तरीही व्हेलच्या उलटीला परफ्युम उद्योगात अतिशय महत्त्व असून ती विकल्यावर माणूस मालामाल होतो. यामुळे जिथे व्हेल मासा दिसतो, तिथे मच्छीमारांची नजर या उलटीवर असते. व्हेल माशाची उलटी केवळ बाजारात विकली जात नाही तर ती कोणत्याही हिऱ्यापेक्षाही अधिक मौल्यवान आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की व्हेल माशाच्या उलटीची किंमत बाजारात सोन्या किंवा हिऱ्यांपेक्षा जास्त आहे. एम्बरग्रीस म्हणजे, व्हेलची उलटी ही हार्ड मेणासारखी असते, जी स्पर्म व्हेलच्या पाचन तंत्रात असलेल्या आतड्यांमध्ये तयार होते. मात्र याला अनेकजण व्हेल माशाची उलटी असं संबोधतात. तज्ञांच्या मते, त्याला विष्ठा म्हणतात. व्हेल मासे समुद्रातील अनेक गोष्टी खातात. यामुळे, जेव्हा त्यांना त्या गोष्टी पचवता येत नाहीत तेव्हा ती बाहेर टाकते. ही उलटी राखाडी किंवा काळ्या रंगाचे घन असते. आणि त्याला तीव्र सागरी गंधासह अतिशय तीव्र विष्ठेचा गंध असतो. काहीवेळा त्याला तपकिरी आणि काळ्या रंगाचा आणि हलका, मातीचा, गोड वास असतो पण तरीही सौम्य समुद्राचा सुगंध असतो. एम्बरग्रीस अनेकदा समुद्रात तरंगताना आढळते. कधी कधी ते समुद्रकिनाऱ्यांवर लाटांसोबतही येते. यासोबतच ते मृत व्हेलच्या पोटातही आढळू शकते. याला समुद्राचा खजिना किंवा तरंगणारे सोने असेही म्हणतात. संपूर्ण भारतातील तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, व्हेल माशाची उलटी १ ते २ कोटी रुपये प्रति किलोग्राम आहे. ही उलटी अत्यंत दुर्मिळ असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि किंमतही जास्त आहे. पारंपारिकपणे, एम्बरग्रीस चा वापर परफ्यूम तयार करण्यासाठी केला जातो ज्यामध्ये कस्तुरीच्या कण असतात. पूर्वीच्या काही संस्कृतींमध्ये खाद्यपदार्थ, अल्कोहोलयुक्त पेये आणि तंबाखूमध्ये चव येण्यासाठी त्याचा वापर केल्याच्या नोंदी आहेत. पण सध्या यासाठी ते क्वचितच वापरले जाते. याशिवाय, काही देशांमध्ये याचा उपयोग औषधे बनवण्यासाठीही केला जातो. उत्तरप्रदेशमध्ये आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या ४.१२ किलो उलटीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल १० कोटी रुपये असल्याची माहिती आहे. याची किंमत जास्त असल्याने लोक हे माशांना मारून त्यांची उलटी मिळवतील, आणि अशाने व्हेल माशांच्या अस्तित्वालाच निर्माण होईल, म्हणून व्हेल माशाच्या या उल्टीची विक्री करण्यास प्रतिबंध आहेत. त्याचा व्यापार करणं हे बेकायदेशीर मानलं गेलेलं असून त्यासाठी तुम्हाला शिक्षा सुद्धा होऊ शकते
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!