Just another WordPress site

अबब! फक्‍त एका ग्रॅमची किंमत ५,००० अब्ज रुपयांपेक्षाही जास्त, ‘हा’ आहे जगातील सर्वाधिक महाग धातू

जगात सर्वात महागडा धातू कोणता, असं विचारलं तर तुम्ही सोनं, चांदी, हिरे, प्लॅटिनम अशी उत्तरं द्याल. जरी हे धातू स्वस्त नसले तरीही जगातील सर्वात महागडा धातू तुम्हाला वाटते तो हा अजिबात नाहीये. याहीपेक्षा एक महागडा असा धातू या जगात आहे. आपल्या कल्पनेच्याही पलिकडे याची किंमत आहे. एखादी व्यक्ती हा धातू खरेदी करू शकेल की नाही, हेही सांगता येत नाही. कारण हा १ ग्रॅम धातू खरेदी करण्यासाठी जगातले अनेक छोटे-मोठे देशही विकावे लागतील. तर चला याच महागड्या धातूविषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. जगातील महागड्या धातूंच्या यादीत सोन्याला स्थान नाही
२. सोनं-चांदी अन् हिऱ्यांपेक्षाही जगात एक महागडा धातू आहे
३. ‘अँटीमेटर’ नावाचा हा जगातील सर्वात महागडा धातू
४. ‘अँटीमेटर’च्या १ ग्रॅम तुकड्याची किंमत ६२.५ ट्रिलियन डॉलर

 

जर तुम्ही जगातील सर्वात धातूचा विचार केला तर तुमच्या डोक्यात सोनं, हिरे हे येत असेल. सध्या सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जातं. मात्र, जगातील महागड्या धातूंच्या यादीत सोन्याला स्थान नाही. खरं तर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण हेच खरं आहे. कारण जगात सोनं-चांदी अन् हिऱ्यांपेक्षाही एक महागडा धातू आहे. ज्याच्या एक ग्रॅमची किंमत अनेक देशांच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त आहे. कदाचित आपल्यापैकी अनेकांनी या धातूचे नावही ऐकले नसेल. पण ‘अँटीमेटर’ नावाचा धातू हा जगातील सर्वात महागडा धातू आहे. हा धातू जगात सर्वात मौल्यवान मानला जातो. नासाच्या मते, या धातूच्या १ ग्रॅम तुकड्याचे किंमत ६२.५ ट्रिलियन डॉलर म्हणजे, भारतीय चलनानुसार जवळपास ५,००० अब्ज रुपयांपेक्षाही जास्त आहे.
अँटीमेटरचा वापर अंतराळयान आणि विमानांमध्ये इंधन म्हणून केला जातो. अँटीमेटरकडे विध्वसंक स्पोटक म्हणूनही पाहिले जाते. अर्धा किलो अँटीमेटरमध्ये एक हायड्रोजन बॉम्ब पेक्षा जास्त शक्ती असते. या धातूचं वैशिष्ट्य म्हणजे, तो इतर धातूंप्रमाणे खाणीत किंवा वातावरणात इतरत्र सापडत नाही. तर प्रयोगशाळेत तयार होतो. अंतराळात या धातूचा शोध लागला. हा धातू ब्लॅक होलमध्ये तारा दोन भागांमध्ये तुटल्याच्या घटनेने तयार होतो. अंतराळात छोट्या-छोट्या कणांमध्ये अँटीमेटर सापडते. तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल की,
एक ग्रॅम अँटीमेटरची विक्री करून जगातील १०० छोटे देश खरेदी केले जाऊ शकतात.
या धातूत असामान्य ऊर्जा असते. सर्न येथील प्रयोगशाळेत हा धातू सर्वात आधी पदार्थ तयार केला गेला. पहिल्यांदा तो बनवला तेव्हा फक्त १० नॅनोग्राम एवढ्या वजनाचा तयार केला गेला. हा धातू तयार करण्यासाठीची प्रक्रिया खूप खर्चिक आहे. शास्त्रज्ञ सध्या या धातूवर संशोधन करत आहेत. याचा वापर अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी होऊ शकतो. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात. कँसरसारख्या आजारांमध्ये अँटीमॅटरचा वापर होऊ शकतो. सामान्य इंधनाच्या तुलनेत अँटीमेटरच्या ऊर्जेची घनता जास्त असल्याने हा धातू रॉकेट इंधन म्हणून देखील वापरला जाऊ शकतो. मात्र, हा धातू तयार करणं इतके सोपे नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!