Just another WordPress site

Akola News : अवैध सावकारांवर धाडी, सहकार विभागाच्या ९ पथकांची कारवाई, सावकारांची नावे गुलदस्त्यात

District Collector Action Against Money Lenders : तब्बल दोन वर्षांनंतर सहकार विभाग (Department of Cooperation) सक्रिय झाला असून, बुधवारी अकोला शहरातील अवैध सावकारांवर (illegal lenders) धाडी घालण्यात आल्या. विभागाने सकाळी एकाच वेळी ९ पथकांव्दारे गौरक्षण रोड, सिंधी कँप व जयहिंद चौकातील अवैध सावकारांवर कारवाईचा सिंकजा कसला. त्यामुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, या धाडी सहकार विभागाला प्राप्त झालेल्या तक्रारीवरून घालण्यात आल्या आहेत तर आता हे धाडसत्र सुरुच राहणार असल्याचे संकेत सूत्रांकडून मिळाले आहेत. तथापी या धाडीतील सावकारांच्या नावांचा उल्लेख सहकारी विभागाकडून करण्यात आला नाही.

Sharad Pawar : पक्ष व पक्षचिन्ह गेल्यानंतर शरद पवारांसमोर काय पर्याय? हे चिन्ह व नाव मिळण्याची शक्यता 

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ नुसार उपनिबंधक, सहकारी संस्था तालुका अकोला कार्यालयाकडे अवैध सावकारीच्या प्राप्त झालेल्या तक्रारींवरून हे धाडसत्र राबविण्यात आले. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग – १, सहकारी संस्था यांच्या मार्गदर्शनात या धाडी घालण्यात आल्या. शहरातील विविध भागातील
तीन ठिकाणी तब्बल ९ पथकांनी एकाच वेळी संयुक्तपणे अवैध सावकारांवर छापे घातले.

यांचा होता पथकांत समावेश
या धाडसत्र पथक प्रमुख म्हणून सहाय्यक निबंधक (प्रशासन) अभयकुमार कटके, ए. एम. भाकरे, मनमुटे, एस. डी. नरवाडे, वाय. पी. लोटे, डी.डब्ल्यू. सिरसाट, एस. एम. खान, आर. डी. विटणकर, ए. ए. मनवर, तसेच फिरत्या पथकामध्ये तालुका उपनिबंधक ज्योती मलिये, सहकार अधिकारी श्रेणी – २ जी. पी. भारस्कर यांचा समावेश होता. या कारवाईमध्ये लेखापरीक्षण विभाग, गट सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी, मत्स्य विभाग, जिल्हा सैनिक कार्यालय, पतसंस्था कर्मचारी पथक सहाय्यक, पंच म्हणून तर पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता.

या ठिकाणी घातले छापे
सहकार विभागाच्या पथकाने गोरक्षण रोड, सिंधी कँप व जयहिंद चौक येथील सावकारांवर छापे घातले. यामध्ये एकूण ४ सावकारांचा समावेश आहे. तथापि, त्यांच्या फ्लॅट, घर, दुकान अशा एकूण सात ठिकाणी धाडी घालून आक्षेपार्ह दस्तावेज हस्तगत केले.

या छाप्यात सावकारांकडून काय मिळाले छाप्यात?
■ १८ इसार पावत्या ६१ मूळ
■ छायाप्रत खरेदीखत
■ १३ करारनामे पावत्या
■ २३ कोरे धनादेश
■ २९ लिहिलेले धनादेश
■ ६ रद्द केलेले धनादेश
■ १ उसनवारी पावती
■ १ लायकी दाखला
■ १ कोरे लेटरहेड
■ ९ नोंदी असलेल्या डायऱ्या ६ ताबा पावती व भरणा पावती
■ १ वाहनविक्री पावती
■ आरसी कार्ड
■ तक्रारदार यांच्या संबंधाने दस्तऐवजांच्या छायाप्रती धारिका-१ असे दस्तावेज मिळून आले आहेत.

धाडीमधील जप्त दस्तावेजांची पडताळणी तसेच प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.
ज्योती मलिये, सावकारांचे उपनिबंधक तथा उपनिबंधक
सहकारी संस्था, तालुका अकोला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!