Just another WordPress site

शेती : तुमच्या शेतजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?

शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. पूर्वी शेतीचा नकाशा काढण्यासाठी शेतकऱ्याला भूमी अभिलेख कार्यालायत चकरा माराव्या लागायच्या. मात्र, आता राज्य सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबतच जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. मात्र, अनेकांना शेतीचा नकाशा कसा पाहायचा, ते माहीती नाही. त्यामुळे  गावचा किंवा शेतीचा नकाशा कसा काढायचा, तो कसा वाचायचा हेच आपण आज जाणून घेणार आहोत.


शेत जमिनीचा नकाशा आता तुम्ही घर बसल्याही मोबाईलवरून काढू शकता. त्यासाठी शासनाच्या वेबसाईटवर जाऊन योग्य ती माहीती फिल अप केल्यावर तुम्ही जमीनीचा नकाशा डाऊनलोड करू शकता.


जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा ?

– आपल्याला जमीनीचा नकाशा  ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर  भू- नक्शा असे सर्च करायचंय. 

– त्यानंतर तुमच्यासमोर भू- नल्शा http://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp  नावाची लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नविन पेज उघडेल.

– ओपन झालेल्या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला  Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी  मध्ये Rural आणि Urban असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर Rural हा पर्याय निवडायचा निवडा. आणि शहरी भागात असाल, तर Urban हा पर्याय निवडायचा आहे.



– हे पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा  तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचंय. हे निवडलं की, सगळ्यात शेवटी Village Map यावर क्लिक करायचंय

– ही सगळी माहिती अचुक भरल्यानंतर शेजारी उजव्या बाजूला तुमची जमीन ज्या गावात येते, त्या  गावाचा नकाशा उघडला जाईल. 

– ओपन झालेला नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहण्यासाठी तुम्हाला  होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करावं लागेल. 

– त्यानंतर डावीकडील झूम इन + किंवा  झूम आऊट  – या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो.

– पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसतील, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जायचं आहे


आता पाहूयात जमिनीचा नकाशा कसा काढायचा?

– जमिनीचा नकाशा काढायचा असेल तर तुम्हांला याच पेजवर खालच्या बाजूला   Search By Plot Number या नावानं एक रकाना तुम्हाला दिसेल. 

– या रकान्यात तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा. त्यानंतर  तुमच्या जमिनीचा गट नकाशा नकाशा निळ्या रंगात रंगवलेला दिसेल. होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.

– आता डावीकडे Plot Info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची  माहिती दिसेल. तुम्ही दिलेल्या गट क्रमांत ज्या ज्या शेतकऱ्यांची जमिन आहे, त्याचीही माहिती तुम्हाला त्याठिकाणी दिसेल.

– ही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी Map Report नावाचा पर्याय असतो. या मॅप रिपोर्टवर क्लिक केलं की, तुमच्या जमिनीचा plot report तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्यास म्हणजेच डाऊन अॅरोवर क्लिक केलं की तुम्ही जमिनीचा प्लॉट रिपोर्ट  डाऊनलोड करू शकता.

– त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात. आणि मग खालच्या भागात या गट नकाशात कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.


ई-नकाशा प्रकल्प काय आहे?

भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे जतन करून ठेवलेत. हे नकाशे १८८० सालापासूनचे आहेत. त्यामुळे आता हे नकाशे फार नाजूक स्थितीत असल्यामुळे  त्यांना डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी ई-नकाशा हा प्रकल्प हाती सरकारनं हाती घेतला. या अंतर्गत तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील फाळणी नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे इ. नकाशांचं डिजिटायजेशन करण्यात येते. त्यामुळे डिजिटल सातबारा, आठ-अ यासोबतच जनतेला आता डिजिटल नकाशाही ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे. या नकाशांच्या आधारे जमिनीच्या हददी कायम करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे हे नकाशे महत्त्वाचे असतात.


आता तुम्ही घरबसल्याच जमीनीचा नकाशा काढा आणि ऑनलाईन नकाशा कसा काढायचा ते इतरांनाही सांगा.  

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!