Just another WordPress site

Why two pilots have different meals? विमानातील दोन पायलटला का दिले जाते वेगवेगळं जेवण? नेमकं याचं कारण काय?

आपण आकाशात अनेकदा विमान पाहतो. लहानपणी आपल्याला याचे विशेष कौतुक वाटायचं. विमानातून एकदा तरी प्रवास करावा, असं तेव्हा तुम्हा प्रत्येकाला वाटलं असेल. नंतर तुमच्यापैकी अनेकांनी विमानात प्रवासही केला असेल.  तुम्ही विमानाने प्रवास केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की विमानात दोन पायलट असतात. एक असतो पायलट तर दुसरा असतो को-पायलट. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की पायलट आणि को-पायलट यांना विमानात  वेगवेगळं जेवण दिलं जातं? याच विषयी जाणून घेऊ.महत्वाच्या बाबी 

१. विमानात एक नाही तर दोन पायलट असतात

२. एक असतो पायलट असेल तर को-पायलट असतो

३. दोन्ही पायलटला वेगवेगळं जेवन देण्यात येतं

४. खबरदारीचा भाग म्हणून देण्यात येतं वेगवेगळं जेवण 


विमान कंपन्या विमान प्रवासादरम्यान आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देतात. ज्याप्रमाणे एका ट्रेनमध्ये दोन मोटरमन असतात आणि दोघांनाही स्वतंत्र सीट असतात, त्याचप्रमाणं प्रत्येक विमानात एक पायलट आणि एक को-पायलट असतो. त्यांच्या जागाही वेगवेगळ्या आहेत. जेव्हा जेव्हा पायलट आणि को पायलट यांना जेवण दिले जाते, तेव्हा ते कधीही एकसारखे दिलं जात नाही.  

खरेतर दोन्ही पायलटला एकच आहार न देण्यामागे एक सर्वात मोठी घटना कारणीभूत आहे. त्याचं झालं असं की,

१९८४ साली एक कॉनकॉर्ड सुपरसॉनिक फ्लाइट लंडनवरून न्यूयॉर्कला जात होती. या फ्लाइटमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली. या विमानातून एकूण १२० प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना एकच जेवण देण्यात आले होते. त्या जेवणात काहीतरी गडबड होती, ज्यामुळे सर्वांनाच अन्नातून विषबाधा झाली. यानंतर सर्व लोकांना उलट्या, ताप आणि जुलाब झाला. विषबाधा झाल्याने एका प्रवाशाचाही मृत्यू झाला. या फ्लाइटच्या दोन्ही पायलटला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं. अशा घटना टाळण्यासाठी आता अत्यंत सावध पावले उचलली जात आहेत. त्यामुळे एकाच विमानाच्या पायलट आणि को पायलटला सारखं जेवण दिलं जात नाही. कारण,  समजा, दोन्ही पायलटला सारखा  आहार दिला गेला आणि जेवणात कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर दोन्ही पायलटचे आरोग्य बिघडेल. अशा परिस्थितीत दोन्ही पायलटला उपचारांची गरज भासणार हे नक्की. मग अशावेळी विमान कोण उडवणार, हा त्या वेळचा सर्वात मोठा प्रश्न असेल. त्यामुळं एकाच वेळी दोन पायलटची प्रकृती बिघडल्यास प्रवाशांची सुरक्षा सर्वाधिक धोक्यात येऊ शकते. त्यामुळं विमान कंपन्या खबरदारी म्हणून दोन्ही पायलटला वेगवेगळे जेवण देतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!