Just another WordPress site

Why tattoos banned in government jobs? सरकारी नोकरी आणि टॅटूचा काय संबंध? टॅटू असणाऱ्याला सरकारी नोकरीत का घेत नाहीत?

जोडीदारावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. मग रिलेशनमध्ये असल्यापासून निरनिराळ्या तऱ्हेने जोडीदाराला खूश केले जाते. तरुणांमध्ये टॅटू काढण्याचे  बरेच फॅड पाहायला मिळते. टॅटू काढू पाहणाऱ्या व्यक्तीला एक गोष्ट सांगितली जाते की, टॅटू काढू नकोस, सरकारी नोकरी मिळणार नाही! सर्वांनाच माहीत आहे की टॅटू काढल्यावर सरकरी नोकरी मिळत नाही. मात्र,  सरकारी नोकरीत टॅटूला बंदी का असते? याच विषयी जाणून घेऊ. 


महत्वाच्या बाबी 

१. आजच्या पिढीमध्ये टॅटूची भलतीच क्रेझ

२. टॅटू असलेल्याला सरकारी नोकरी नाही! 

३. आर्मी, नेव्ही, पोलिस इथं टॅटू चालत नाही

४. क्लर्कच्या नोकरीसाठी टॅटूचा फरक पडत नाही


सध्याची पिढी ही वेगळा विचार करणारी आहे. त्यांच्या विचारांचा पगडा त्यांच्या वागण्या बोलण्या बरोबरच दिसण्यावरही जाणवतो. आजच्या पिढीमध्ये टॅटूची भलतीच क्रेझ आहे. आपल्याकडे पूर्वी गोंदवण्याची पद्धत होती. ती एक धार्मिक, सांस्कृतिक बाब समजली जायची.  पण, आता ही कला लुप्त झाली अन्  तिची जागा टॅटूने घेतली. हल्ली टॅटू काढणं म्हणजे फॅशनचा एक भागच झालाय.  एखाद्या व्यक्तीप्रती आपलं प्रेम व्यक्त करणं किंवा आठवणी जपणं अशा काही कारणांनी अनेक जण आपल्या शरीरावर टॅटू काढून घेतात.  मात्र, टॅटू बद्दल वडीलधाऱ्या माणसांकडून किंवा शिक्षकांकडून एक गोष्ट कायम सांगितली जाते की,  टॅटू नको काढू तुला नोकरी मिळणार नाही. यामुळं कित्येकांनी कधी टॅटू कधी काढलाच नाही. खरंतर सरकारी नोकरीत रुजू होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला काही प्रक्रियांना सामोरं जावं लागतं.  त्यामध्ये व्यक्तीचं कौशल्य, वागणूक, विचार या सोबतच व्यक्तीची वैद्यकीय चाचणी देखील केली जाते. सरकारी नोकरीच्या नियमानुसार व्यक्तीच्या इतर वैद्यकीय चाचण्यांसोबतच शरीरावर टॅटू नाही ना! याची देखील खात्री केली जाते. त्या व्यक्तीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा टॅटू असल्यास त्याला सरकारी नोकरी मिळत नाही. शरीरावर टॅटू काढण्यास लष्कर, सुरक्षा एजन्सी, पोलीस यासारख्या सेवांमध्ये मनाई आहे. लष्करात तसा कायदाच आहे. कारण,  टॅटूमुळे त्वचा रोग किंवा रक्ताचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. या सोबतच टॅटू काढल्यामुळे एच.आय.व्ही, एलर्जी, हेपेटाईट्स यासारखे रोग होण्याच्या संभावना असतात. हे रोग टॅटूमुळे निर्माण होण्याची शक्यता असल्यानं टॅटू काढणाऱ्याला सरकारी नोकरी दिल्या जातं नाही. दुसरं असं की, टॅटूमुळे आपल्या शरीरावर एक विशिष्ट खूण तयार होते. पोलीस किंवा आर्मीत रूजू होऊ पाहणाऱ्या व्यक्तीने जर टॅटू काढला तर त्याच्यावर नजर ठेवणं किंवा निशाणा साधणं यासारख्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. ज्यामुळे आपल्या देशाला आणि त्या व्यक्तीला धोका निर्माण होतो. म्हणून सुरक्षितता राखण्यासाठी टॅटूला सरकारी नोकरीमध्ये बंदी घातली जाते. त्यामुळं  आर्मी, सीआरपीएफ, नेव्ही, एअर फोर्स,  या क्षेत्रात करिअर करणार असाल तर टॅटू तिथं अलाउड नाही. पोलिसांच्या नोकरीतही टॅटू चालत नाही. मात्र, बँक, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, रेल्वे, पीडब्लूडी विभाग अशा ठिकाणी जर तुम्ही क्लर्क किंवा प्रोबेशनरी ऑफिसरच्या नोकरीसाठी अप्लाय करत असाल तर टॅटू असला नसला विशेष काही फरक पडत नाही. दरम्यान, ही फॅशन भलेही तुम्हाला अधिक भावत असेल, पण तिचा दूरगामी परिणाम तुमच्या  करिअरवर होऊ शकतो. त्यामुळं ही फॅशन जरा जपूनच आजमावा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!