Just another WordPress site

Why ants walk in a straight line? मुंग्या नेहमी एका सरळ रेषेतच का चालतात? काय आहे त्यामागचं कारण?

मुंग्या आपल्या आजूबाजूला कायमच आढळतात. मग ते स्वयंपाक घर असो, वा बेडरूम. कुठेही मुंग्या असतात. घरात खाण्यापिण्याच्या गोष्टींना लागलेली मुंग्यांची रांग नेहमी आपलं लक्ष वेधून घेते. मुंग्या घालवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय देखील करतो. पण मुंग्या नेमक्या एका रांगेत कशा आणि का चालतात? याच विषयी जाणून घेऊ.


महत्वाच्या बाबी 

१. मुंग्याच्या १२ हजारापेक्षा अधिक प्रजाती आहेत

२. मुंग्या या नेहमी एका सरळ रांगेत चालतात 

३. मुंग्यांमध्ये फोरोमॉन्स नावाच रसायन आढळते 

४. रसायनाच्या मदतीने मुंग्या एकमेकींना अलर्ट करतात 


मुंग्यांना आपण एक सामाजिक प्राणी देखील म्हणून शकतो. कारण  त्या नेहमी कळपात फिरतात. आणि सर्व ठिकाणी आढळतात. त्या समूहानं वास्तव्य करतात. यात एक राणी मुंगी, नर मुंगी आणि बहुतेक मादा मुंग्या असतात. पंख असलेल्या मुंग्या या नर मुंग्या असतात. तर पंख नसलेल्या मुंग्या या मादा मुंग्या असतात. जगामध्ये मुंग्याच्या साधारण बारा हजारापेक्षा अधिक प्रजाती आहेत. मुंग्यांचे वैशिष्ट म्हणजे,  एक मुंगी आपल्या वजनापेक्षा २० पट जास्त वजन उचलू शकते. आपल्या सर्वांना वाटतं की, या पृथ्वीवर मानवाची संख्या ही सर्वात जास्त आहे. मात्र, हे चुकीचे असून या पृथ्वीवर मानवांपेक्षा कितीतरी पटीने जास्त मुंग्याची संख्या आहे.  मुंग्यांमध्ये अनेक अनोख्या गोष्टी पाहायला मिळतात. मुंग्यांची एक सवय पाहून आपल्या सर्वांनाच आश्चर्य वाटते. ती म्हणजे, या मुंग्या मोठ्या शिस्तप्रिय असतात… त्या एकाच रांगेत चालतात… मुंग्या एका रांगेत चालण्याचं कारण आहे, एक रसायन. हो,  मुंग्यांमध्ये एक विशेष प्रकारचे रसायन आढळतं, ज्याचं नाव आहे फोरोमॉन्स. या रसायनाच्या मदतीने मुंग्या मार्गक्रमण करत असतात. कारण, मुंग्यांना डोळे असतात हे खरं आहे. पण ते फक्त शोभेसाठी असतात, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण अन्नाच्या शोधात जेव्हा मुंग्या बाहेर पडतात, तेव्हा इतर मुंग्याना वाट सापडावी म्हणून त्यांची राणी मुंगी रस्त्यात फोरोमॉन्स नावाचं द्रव्य टाकत जाते. या द्रव्याचाच गंध घेत इतर मुंग्या तिचा पाठलाग करतात. आणि  रांगेत पुढे-मागे चालत राहतात. यामुळे एक रेषा तयार होते. आणि मुंग्या आपल्याला एका रांगेत चालताना दिसतात.  जेंव्हा एक मुंगी चालते तेंव्हा ती प्रत्येक वेळेस द्रव्य सोडते आणि त्यामुळेच इतरही मुंग्या तिच्या मागे एका रांगेत चालतात. थोडक्यात काय,  तर पुढच्या मुंगीने सोडलेल्या रसायनाच्या गंध घेत मुंग्या वाटचाल करतात.  सर्वात पुढे चालणाऱ्या मुंगीला काही धोका असल्याचे लक्षात आल्यास या केमिकलच्या द्वारे ती इतर मुंग्यांना अलर्ट करते. अशाच प्रकारचे मुंग्यांना कोणताही धोका वाटल्यास ते या केमिकलद्वारे दुसऱ्या मुंग्यांना अलर्ट करत राहतात. आणि आपली वाट चालतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!