Just another WordPress site

शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांचा दसरा मेळाव्यात समाचार घेणाऱ्या सुषमा अंधारे आहेत तरी कोण?

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचे तर बीकेसी मैदानातील शिंदे गटाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदेंचे भाषण झाले. मात्र या दोन्ही नेत्यांच्या आधीही काही नेत्यांनी भाषणे केली. त्यात शिवसेनेत नुकत्याच आलेल्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांच्या भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे. दरम्यान, तुफानी भाषणाने दसरा मेळावा गाजवणाऱ्या सुषमा अंधारे आहेत तरी कोण? याच विषयी जाणून घेऊ.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना वाढवण्यासाठी आपण लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. जुलै महिन्यात त्यांनी हाती शिवबंधन बांधलं. विशेष म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक होत्या. त्यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका तेव्हा केली होती.

उस्मानाबादच्या कळबं तालुक्यात जन्मलेल्या सुषमा अंधारे या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी एमए, बीएड, पीएचडी, लॉ इत्यादी पदव्या मिळवल्या आहेत. वकील असलेल्या सुषमा अंधारे या राज्यशास्त्र अन् समाजशास्त्र विषयाच्या व्याख्याता आहेत. याशिवाय एक वक्ता आणि लेखिका अशीही त्यांची ओळख आहे. आपल्या खास आक्रमक शैलीतील भाषणासाठी त्या ओळखल्या जातात. अलिकडच्या काळात राजकीय मंचावरील भाषणांमुळे त्या सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत. पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील त्या सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. ‘

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीचा प्रचार करताना संभांमध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरेंवरही गंभीर टीका केली होती. आज त्याच सुषमा ठाकरे शिवसेनेच्या व्यासपीठावरून भाजपसह शिंदे गटावर बरसल्या. शिवसेनेत प्रवेशानंतर त्यांना प्रश्नही विचारला गेला होता की, आधी शिवसेनेसह उद्धव ठाकरेंवर टीका केली होती, आता शिवसेनेत प्रवेश करताय? यावर बोलताना अंधारे यांनी सांगितलं होतं की, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. मी टीका केली होती पण आज मनाने इकडे येतेय.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!