Just another WordPress site

काय सांगता! भारतातील ‘या’ मंदिरात प्रसाद म्हणून मिठाई नाही, तर सोन्या-चांदीचे दागिने मिळतात

तुम्ही अनेकदा देव दर्शनासाठी मंदिरात जात असाल. लहान असतांना अनेकजन मंदिरात गेल्यावर देवबाप्पा प्रसाद देतो, म्हणून मंदिरात जायचे. साधारणत: मंदिरात गेल्यावर प्रसाद म्हणून मिठाई मिळते. मात्र, भारतीत एका मंदिरात दर्शनाला गेल्यावर प्रसाद म्हणून सोनं-चांदी मिळतं, असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पण, हो, हे खरंय. भारतील एका अनोख्या मंदिरात प्रसाद म्हणून मिठाई नाही, तर चक्क सोनं-चांदी मिळतं. याच मंदिराविषयी जाणून घेऊ.

महत्वाच्या बाबी 

१. साधारणत: मंदिरात गेल्यावर प्रसाद म्हणून मिठाई मिळते
२. तिरुपती बालाजी मंदिर हे देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थान
३. मध्यप्रदेशातील महालक्ष्मीच्या मंदिरात प्रसाद म्हणून सोनं
४. मंदिरात धनत्रयोदशीला भरतो कुबेराचा मोठा दरबारात

तुम्हाला ठाऊक असेल की, आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर हे देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. या मंदिरात प्रतिवर्षी ६५० कोटी रुपयांचे दान भाविकांद्वारे केलं जातं. या मंदिरात मिळणारे लाडू जगभरात लोकप्रिय असून, याच्या कमाईतून लाखो रुपये मंदिराला मिळतात. मात्र, या भारतात एक मंदिर असंही आहे की, जिथं, प्रसाद विकून मंदिर श्रीमंत होत नाही, मात्र, भाविकांना जी गोष्ट  प्रसाद म्हणून वाटण्यात येते, त्यामुळं भाविक निश्चितच श्रीमंत होतात. कारण, सामान्यपणे जवळपास सर्वच मंदिरांमध्ये भक्तांना प्रसाद म्हणून मिठाई किंवा काही खाण्याचे पदार्थ मिळतात. मात्र मध्यप्रदेशात असलेल्या महालक्ष्मीच्या मंदिराची खासियत ही आहे की, या महालक्ष्मीच्या मंदिरात भक्तांना प्रसाद म्हणून दागिने मिळतात. इथे येणारे भाविक सोन्या-चांदीची नाणी घेऊन घरी जातात. त्यामुळं भारतातील या अनोख्या मंदिरात भाविक दुरदुरून येतात. हे महालक्ष्मी मंदिर रतलाम जिल्ह्यातील माणकमध्ये स्थित आहे. या मंदिरात भक्तांना प्रसाद स्वरूपात लाडू आणि अन्य खाद्यपदार्थां ऐवजी  सोन्या चांदीचे दागिने दिलं जात असल्यानं इथं येणारे भक्त हे मालामाल होऊन परत जातात.  महालक्ष्मीच्या या मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी बघायला मिळते आणि महालक्ष्मीचे लाखो भाविक इथे येऊन कोट्यवधी रूपयांचे दागिने आणि रक्कम देवीला अर्पण करतात. दिवाळीच्या निमित्ताने या मंदिरात कुबेराचा दरबार लागतो. या काळात धनत्रयोदशीपासून पाच दिवसांपर्यंत मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. मंदिराला फुलांनी नाही तर, पैसे आणि दागिन्यांनी सजवल्या जाते. असं म्हटलं जातं की, धनत्रयोदशीला कुबेराच्या दरबारात भक्तांना प्रसादाच्या स्वरूपात सोने-चांदेचे दागिने आणि रुपये दिले जातात. दिवाळीच्या दिवसांमध्ये मंदिराचे कपाट २४ तास खुले राहतात. धनतेरसच्या दिवसांमध्ये या मंदिरातून देवीचा कोणताही भक्त रिकाम्या हाती परतत नाही. त्यांना काहीना काही प्रसाद मिळतोच. दरम्यान, मंदिरात ही दागिने आणि रूपये अर्पण करण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलीये. आधी येथील राजा राज्याच्या समृद्धीसाठी मंदिरात धन देत होते आणि आता भाविकही इथे देवीच्या चरणी दागिने अर्पण करतात. अशी मान्यता आहे की, असं मंदिरात दान केल्यानं तेथिल भक्तांच्या घरात  घरात लक्ष्मीची कृपा नेहमी राहते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!