Just another WordPress site

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात गोळीबाराचा थरार; दिवसाढवळ्या २८ लाख लंपास केले लंपास; पोलिसांनी केली नाकाबंदी

पुणे : पुण्यात मार्केट यार्ड येथील एका अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात शिरलेल्या चोरट्यांनी गोळीबार करुन तब्बल २८ लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. दरम्यान, भरदिवसा झालेल्या या गोळीबाराच्या या घटनेमुळे मार्केट यार्ड परिसरात घबराट निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच मार्केट यार्ड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मार्केट यार्ड परिसरात पी.एम. अंगडिया यांचं कार्यालय आहे. ते कुरिअर कार्यालय असल्याची माहिती आहे. आज याठिकाणी ४ ते ५ जण आले त्यांनी गोळीबार केला आणि तब्बल २८ लाखांची रोकड पळवून नेली. तक्रारदार हे सकाळी ११ वाजताच्या दरम्यान त्यांच्या ऑफीसमध्ये आलेले होते. आल्यानंतर त्यांनी कॅश चेक केली. त्यानंतर पावणे १२ च्या सुमारास ५ आरोपी आले. त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला आणि पैशांची मागणी केली. कर्मचाऱ्यांना धमकावण्यासाठी चोरट्यांनी गोळीबार केला. कार्यालयातील २८ लाख रुपयांची रोकड लुटून चोरटे पसार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, पोलिसांच्या पथकाने पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी तातडीने नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!