Just another WordPress site

शिंदेंना उद्योगपतीच्या दबावामुळे मिलिंद देवरांना पक्षात घ्यावे लागले; संजय राऊतांचं मोठं विधान

 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिल्लीचा दबाव आणि एका उद्योगपतीच्या सांगण्यावरून मिलिंद देवरा (Milind Deora) यांना स्वतःच्या पक्षात प्रवेश द्यावा लागला, असा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला. एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आले होते की, मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश करून घ्या. इतकेच नाही तर त्यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

आयकर विभागात नोकरीची संधी, दहावी पास उमेवदवार करू शकतात अर्ज, महिन्याला पगार १ लाख ४२ हजार 

यापूर्वी शिंदे गटात गेलेले काही लोक ‘आमचा पक्ष, आमचा पक्ष ‘, असे म्हणत असतात. अशा लोकांचे आता काय होणार? उद्योगपतींच्या दबावामुळे जर बाहेरुन आलेले लोक तुमच्या पक्षात ताबडतोब मोक्याच्या पदांवर जाणार असतील तर या गटाचे भविष्य काही खरे नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. राऊत यांच्या आरोपावर आता शिंदे ट आणि भाजपचे नेते काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. काँग्रेस हायकमांडने या गोष्टीची गंभीर दखल घेतल्याची चर्चा आहे. मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांकडून यासंदर्भात अहवाल मागवण्यात आल्याचेही सांगितले जाते.

Lok Sabha elections : महायुतीतही जागावाटपावरून अंतर्गत धुसफूस, ‘या’ मतदार संघावरून वाद पेटला 

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. काँग्रेस हायकमांडने या गोष्टीची गंभीर दखल घेतल्याची चर्चा आहे. मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांकडून यासंदर्भात अहवाल मागवण्यात आल्याचेही सांगितले जाते.

राममंदिर वादग्रस्त जागेपासून ४ किलोमीटर अंतरावर
अयोध्येतील राममंदिरासंदर्भात भाजप पक्ष कायम, ‘मंदिर वही बनाऐंगे’ असा नारा देत आला आहे. मात्र, आता अयोध्येत जाऊन बघा. ज्या जागेवर राममंदिर बांधले जाणार होते, तिथे प्रत्यक्षात मंदिराची उभारणी झालेली नाही. वादग्रस्त जागेपासून ४ किलोमीटर अंतरावर राममंदिराची उभारणी सुरू आहे. त्यामुळे वादग्रस्त जागा अजूनही तशीच आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊतांच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. राममंदिर आंदोलनात ज्यांचे काहीही योगदान नाही, असे लोक काहीही आरोप करून स्वतःचे हसे करुन घेत आहेत. कोट्यवधी हिंदूंचा अपमान करत आहेत. आतातरी उबाठा सेनेने हिंदू समाजाचा अपमान करणे बंद करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!