Just another WordPress site

Saniya Mirza : कोणत्या-कोणत्या कारणांमुळे कायम वादग्रस्त राहिली भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा?

भारतात जेव्हाही टेनिसचा विषय निघतो आणि त्यातही महिला टेनिसची चर्चा झाली तर एकच नाव सर्वांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सानिया मिर्झा.  विराट कोहलीने आपल्या कप्तानपदाचा राजीनामा दिला, असं असतांनाच आता सानिया मिर्झानेही स्पर्धात्मक टेनिसमधून निवृ्त्तीचा निर्णय जाहीर केला. भारतातील सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू म्हणून सानिया मिर्झाकडे पहिले जाते. मात्र, असे जरी असले तरी तिच्या वादग्रस्त कृतींमुळे ती तितकीच चर्चेत सुद्धा आली आहे, नेमके काय आहेत ते वाद. जाणून घेऊया.हायलाईट्स

१. सानिया मिर्झाने टेनिस करियरला ठोकला राम राम 

२. सानियावर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप

३. वादग्रस्त कृतींमुळे अनेकदा सानिया मिर्झा चर्चेत 

४. कर्तृत्व सिध्द करून सानियाने पॉवरफुल प्रतिमा जपली


खेळतांना आखूड स्कर्ट घातल्यामुळे वाद 

भारतातील महिलांमध्ये टेनिसची क्रेझ निर्माण करण्यात सानिया मिर्झाचा मोलाचा वाटा आहे. टेनिस खेळताना महिला खेळाडूंचा पोषाख ही बाब आता काही नवी राहिलेली नाही. टि शर्ट, स्कर्ट, मोजे आणि शूज असा पेहराव करत आत्मविश्वासाने मैदानात उतरणाऱ्या सानियाने आजवर अनेक विक्रम केले, मात्र  टेनिस खेळणे आणि तेही स्कर्ट घालून, हे अनेकांना मान्य नसते. यावरून अनेकदा वादही झाले.. पायजमा घालून खेळ, अशी समज देत जिवे मारण्याच्या धमक्याही सानियाला मिळाल्या. तिच्या याच पोषाखावरून एकदा रणकंदन माजले होते. तरीही तिचा प्रवास थांबला नाही.२००५ साली करिअरच्या सुरुवातीलाच तिच्यावर एका धर्मगुरूने टिका केली होती. महिला असून अशा प्रकारचा पोषाख करणे गैर असल्याचा फतवाच त्यांनी काढला होता. मात्र माझा पोषाख ही माझी वैयक्तिक बाब आहे, असं सानियाने ठणकावलं होतं. खेळण्यासाठी हे कपडे अनुकूल असल्याची ठाम भुमिका घेत सानियाने काही काळानंतर हा वाद मिटवला.


सानियावर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप

देशासाठी अनेक गोल्ड मेडल्स मिळवणाऱ्या सानियाचे देशभर कौतुक होतेच, मात्र एकदा चक्क राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी तिला टिकेला सामोरे जावे लागले होते. २००८ मध्येही एका कार्यक्रमादरम्यान सानिया मिर्झाचा एक फोटो व्हायरल झाला होता.  सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या त्या फोटोत सानिया तिरंग्यासमोर पाय पसरून बसल्याचे दिसत होते.  त्यात सानियाने तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर  देशभरातून सानियावर मोठी टिका झाली. 


शोएब मलिकशी विवाह केल्याने सानियावर टीका 


२००९ साली सानियाचा साखरपुडा मोडल्याची घटना घडली. सानियाने तिचा बालपणीचा मित्र सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केला होता, मात्र, ६ महिन्यांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याच वर्षी पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिकशी लग्न करण्याचा धाडसी निर्णय सानियाने घेतला आणि त्यावरून बराच वाद झाला होता. देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूने पाकिस्तानी कुटुंबाची सून व्हावे ही बाब अनेकांना मान्य नव्हती. मात्र सानिया आपल्या निर्णयावर ठाम होती.  २०१० साली शोएब आणि सानिया यांनी ‘निकाह’ केल्यानंतर ती भारताचे प्रतिनिधित्व करते, या मुद्द्यावरून अनेकदा सानियावर टीका करण्यात आली. मात्र, सानियाने या वादाकडे फारसं लक्ष दिलं नाही. दरम्यान, स्वत:चे कर्तृत्व सिध्द करून सानियाने आपली पॉवरफुल प्रतिमा जपली.


लिएंडर पेस बरोबर खेळण्यास नकार

प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेसबरोबर खेळण्यास सानियाने नकार दिला होता. यावर टेनिस संघाने अनेकदा समजूत काढूनही तिने आपला निर्णय न बदलल्याने तिच्यावर बरीच टिका झाली होती. लहान वयात अशा प्रकारचा निर्णय घेतल्याने अंहकारी, गर्विष्ठ अशा अनेक मथळ्यांखाली देशभर तिच्यावर टिका झाली होती. मात्र सुरुवातीच्या काही मॅचेस सोडल्या तर सानियाने  लिएंडरसोबत एकही सामना खेळली नाही.


सानियामुळे स्टार सिंग जेलमध्ये

सानियाचा शोएबशी विवाह झाल्यानंतर बिहारचा स्टार सिंगर खेसारी लाल यांनी ”टेनिस वाली सानिया दूल्हा खोजली पाकिस्तानी” हे गाणं प्रदर्शित केलं. यावेळी देशभरातून सानियाच्या लग्नावर टिका होत असतानाच या गाण्यामुळे त्यात आणखी भर पडली. अखेरिस खेसारी लालला यांना प्रकरणी तब्बल ३ दिवस पोलिस कोठडीची हवा खावी लागली होती.

इतक्या वादग्रस्त गोष्टी घडूनही सानिया मिर्झा भारताची लोकप्रिय टेनिसपटू ठरली. सानिया मिर्झाने भारतीय महिला टेनिसला जागतिक ओळख मिळवून दिली. दरम्यान, कायम  वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ३५ वर्षीय  सानियाने आता निवृत्तीची घोषणा केली. मात्र,  प्रशिक्षक म्हणूनही काम करण्याचा तिचा मानस आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!