Just another WordPress site

Road Hypnosis: मेटेंच्या अपघातानंतर रोड हिप्नोसिस चर्चेत; रोड हिप्नोसिस हा काय प्रकार आहे? त्यापासून बचाव कसा करायचा?

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाला. मेटे यांचा अपघात कसा झाला याबाबत अद्याप संभ्रम आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण नेमके काय? हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये रोड हिप्नोसिसमुळं त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितल्या जातं. दरम्यान, रोड हिप्नोसिस म्हणजे काय ? त्यामुळे अपघात कसा होतो? त्यात नेमके काय होते? त्यात आपला जीव जाऊ शकतो का ? याच विषयी जाणून घेऊया. 




भीषण अपघातांमागे रोड हिप्नोसिस हा प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानसिक आणि शारिरीक थकव्यामुळं ड्रायव्हरला वाहतूकीचा वेग नियंत्रणात आणणे किंवा गाडी चालवताना डुलकी लागणे असे प्रकार घडतात. त्यामुळं अशा प्रकारचे अपघात होतात. त्यामुळं लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यासांठी रोड हिप्नोसिस हा काय प्रकार आहे याची माहिती घेणं गरजेचं आहे.


रोड हिप्नोसिस म्हणजे काय ?

सोप्या शब्दात सांगायचं झालं तर रोड हिप्नोसिस ही एक शारीरिक स्थिती आहे, जी बहुतेक चालकांना लक्षात येत नाही किंवा त्यांना माहिती नसते. रोड हिप्नोसिस रस्त्यावर गाडी घेऊन उतरल्यानंतर अडीच तासांनी सुरू होते. या अवस्थेत संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात. मात्र, मेंदू जे काही पाहतो ते रेकॉर्ड आणि विश्लेषण करत नाही. रोड हिप्नोसिस हे तुमच्या समोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस अपघात होण्याचे पहिले कारण आहे. तुमच्या वाहनाचा स्पीड १४० किलोमीटरच्या वर असेल तर रोड हिप्नोसिसचा धोका अधिक संभवतो.  रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या १५ मिनिटांत काहीही आठवत नाही. तो  किती वेगाने कार चालवतो आहे किंवा समोरच्या कारचा वेग किती आहे, याचा अंदाज चालकाला येत नाही. हे रोड हिप्नोसिस  रात्रीच्या वेळी अधिक घडते. प्रवासी झोपलेला असल्यास परिस्थिती अधिक गंभीर होते. परिणामी  तुमच्यासमोर चाललेल्या वाहनाला तुमची गाडी मागील बाजूस धडकून अपघात होतो. 

रोड हिप्नोसिसमुळं काय होते?

लांब रस्त्यावर रोड हिप्नोसिसपूर्वी काही काळ चलचित्र बघितल्यासारखे वाटून चालक नुसते बघत रहातो. रोड हिप्नोसिस रात्रीच्या वेळी अधिक वेळा घडते आणि प्रवासी देखील झोपलेले असल्यास, परिस्थिती अधिक गंभीर होते. डोळे उघडे असले तरी मन आणि मेंदू बंद असेल तर अपघात अटळ आहे.

कंटाळवाणा प्रवास किंवा रिकामा रोड असल्यास यात चालकांचा मेंदू लवकर संमोहित होतो. त्यामुळे प्रवासात योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

प्रवास करताना काय काळजी घ्याल ?

– आपण प्रवास करताना दर अडीच तासांनी थांबणे, चालणे, चहा पिणे आवश्यक आहे.

– चालकांने प्रवासात विश्रांती घेणे किंवा थांबणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!