Just another WordPress site

अखेर प्रकाश आंबेडकरांचा ‘इंडियात’ समावेश? राहुल गांधींनी पाठवले भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण

अकोला : राज्यातील महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) वंचितचे सर्वेसर्वा अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedakar) सोबत असल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे. असे झाले तर राज्याचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकरांना कॉग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो न्याय यात्रेत (Bharat Dodo Nyaya Yatra) सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली आहे.

शिंदेंना उद्योगपतीच्या दबावामुळे मिलिंद देवरांना पक्षात घ्यावे लागले; संजय राऊतांचं मोठं विधान 

हे निमंत्रण फक्त भारत जोडो न्याय यात्रेसाठी आहे, महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिलेले नाही, असे आंबेडकरांकडून बोलले जात आहे. मात्र वास्तविकतेत महाविकास आघाडीला देखिल अॅड. आंबेडकरांसारख्या नेतृत्वाची खरी गरज आहे. वंचित बहुजन आघाडीने मागील चार महिन्यात तीन वेळा कॉंग्रेस हायकमांडला पत्र लिहले होते. जर कॉंग्रेस पक्षाने इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित केले, तर राज्यात भाजपाला निवडणूक जिंकणे अवघड होईल. या पत्राची दखल आता कॉंग्रेसने घेतली आहे. अकोल्यात जर अॅड. आंबेडकरांसोबत कॉंग्रेसची आघाडी झाली तर भाजपाजवळ तेवढ्या ताकदीचा उमेदवार देखील नाही. भाजपामध्ये गेल्या महिन्यापासून उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. त्यात भाजपाचे आमदार रणधीर सावरकर, नारायण गव्हाणकर, डॉ. रणजीत पाटील, विजय मालोकार, गोपी ठाकरे आदींच्या नावांपलिकडे भाजपाकडे उमेदवार नाही. त्यामुळे भाजपाची केंद्राची एक टीम काही दिवसांपासून अकोल्यात तळ ठोकून आहे.

आयकर विभागात नोकरीची संधी, दहावी पास उमेवदवार करू शकतात अर्ज, महिन्याला पगार १ लाख ४२ हजार 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!