Just another WordPress site

Wayanad Landslide : वायनाडवर कोसळलं आभाळ! भूस्खलनाच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४३ वर; अनेकजण बेपत्ता, दोन दिवसांचा दुखवटा जाहीर

Wayanad Landslide : केरळच्या वायनाड (Wayanad landslide) येथे मंगळवारी भूस्खलन होऊन किमान १२३ जण ठार, तर १२८ जण जखमी झाल्याची दुर्घटना घडली होती. आपत्तीग्रस्त भागांत शोध व बचावकार्य सुरू केल्यानंतर ढिगाऱ्याखाली अनेकजण मृतावस्थेत आढळून आले. या दुर्घटनेत आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही शेकडो लोक बेपत्ता असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तसेच जखमी झालेल्या लोकांची संख्या वाढली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  सध्या एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे. मात्र, खराब हवामान आणि पावसामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहेत.

लोकांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला टोपी घातली, आता विधानसभेलाही…; रोहित पवारांचे टीकास्त्र  

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी पहाटे दोन आणि साडेचार वाजता दोन ठिकाणी भूस्खलन झाल्याची माहिती दिली असली, तरी संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. पहाटेच्या वेळी घटना घडल्यामुळे गावकऱ्यांना पळण्याची संधी न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेपाडी भागात भूस्खलन झाले असून मुंडक्की, चूरामाला आणि नूलपुळ्ळा या गावांनाही फटका बसला आहे. मृतांत महिला व मुलांची संख्या अधिक असल्याचे समजते.

या भूस्खलनाच्या घटनेचा तब्बल ४ पेक्षा जास्त गावांना फटका बसला आहे. जे यामध्ये अडकले आहेत, त्यांची सुटका करण्यासाठी आणि मदतीसाठी एनडीआरएफची टीम, राज्याचे आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), स्थानिक प्रशासन, पोलीस, नौदल, अग्निशमन दल आणि भारतीय लष्कराकडूनही मदतकार्य सुरु आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी संवाद साधून या घटनेची माहिती घेत सर्वतोपरी मदत केंद्र सरकारकडून करण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिलं. तसचं या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मोदींना मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Orange Cultivation : संत्रा – मोसंबी कलमांचे भाव घसरले, संत्र्याला २५ ते ५० रुपयांपर्यंत तर मोसंबीला ६० रुपये दर… 

दोन दिवसांचा दुखवटा जाहीर
केरळ सरकारने वायनाडमधील भूस्खलनाच्या दुर्घटनेनंतर दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर्स मदतीसाठी पाठवण्यात आली असल्याची माहितीही देण्यात आली आहे. दरम्यान, आजही काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आल्यामुळे तेथील स्थानिक प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं आहे.

मी केरळचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सर्व संस्थांदरम्यान समन्वय राखला जाईल याची खबरदारी घेण्याची विनंती मी त्यांना केली आहे. कोणत्याही मदतीची गरज असेल तर कळविण्यास सांगितले आहे.
– राहुल गांधी,  विरोधी पक्षनेते, लोकसभा

दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे आज वायनाड दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात ते वायनाड भूस्खलनाच्या घटनेची पाहणी करण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!