Just another WordPress site

Who is Madhavi Buch: सेबीच्या अध्यक्षांचे अदानी समूहाशी लागेबांधे, हिंडनबर्गने आरोप केलेल्या माधवी बुच आहेत तरी कोण?

Who is Madhavi Buch: भारतात लवकरच काहीतरी मोठे घडणार, अशी पोस्ट केल्यानंतर हिंडेनबर्ग रिसर्चने थेट सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच (Madhavi Buch) त्यांचे पती धवल बुच (Dhawal Buch) आणि अदानी समूहात संबंध असल्याचा आरोप केला आहे. अदाणी घोटाळ्यात ज्या कंपन्यांचे पैसे वापरण्यात आले, त्या दोन्ही परदेशी कंपन्या बनावट असून त्यात सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची भागीदारी असल्याचा आरोप हिंडनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) केला. दरम्यान, माधवी बुच आहेत तरी कोण आहे? याच विषयी जाणून घेऊ.

पेमेंट अॅपसाठी सोपा ‘पासवर्ड’ धोकादायक, नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरचा इशारा; स्ट्राँग पासवर्ड कसा बनवावा? 

कोण आहे माधवी बुच?
1966 मध्ये जन्मलेल्या सेबीच्या पहिल्या महिला प्रमुख माधवी बुच या मुंबईत लहाणाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे वडील कमल पुरी कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत होते तर आईने राज्यशास्त्रात डॉक्टरेट मिळवली होती. माधवी बुच यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथून एमबीए केले आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्यांचे लग्न धवल बुचसोबत ठरवण्यात आले होते. त्यांचे पती धवल हे बहुराष्ट्रीय कंपनी युनिलिव्हरमध्ये संचालक होते. जेव्हा त्या 21 वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांचा विवाह पार पडला. लग्नानंतर माधवी यांनी आपल्या करिअरला गांभीर्याने घेत मोठी झेप घेतली.

करिअरच्या सुरुवातीच्या काळात आयसीआयसीआय बँकेत काम केल्यानंतर त्यांनी यूकेमध्येही शिक्षण घेतले. माधवी पुरी बुच 2011 मध्ये सिंगापूरला गेल्या. तेथे त्यांनी ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल एलएलपीमध्ये सामील झाल्या. बुच यांनी शांघायमधील न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सल्लागार आणि खाजगी इक्विटी फर्म सिंगापूर कार्यालयाचे प्रमुख म्हणून काम केले आहे. यासोबतच त्यांनी ICICI सिक्युरिटीज लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणूनही काम केलं. बुच यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर बिगर कार्यकारी संचालक म्हणूनही काम केले आहे

माधबी पुरी बुच यांची मार्च 2022 मध्ये सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी अजय त्यागी यांची जागा घेतली. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने माधबी पुरी बुच यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ 2025 मध्ये संपणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, माधबी पुरी बुच यांनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) चे पूर्णवेळ सदस्य म्हणून काम केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!