Just another WordPress site

Dr. Parakala Prabhakar : अर्थव्यवस्थेसह अनेक बाबतीत पंतप्रधान मोदी अकार्यक्षम; अर्थमंत्री सीतारामन यांचे पती डॉ. परकला प्रभाकर यांचा हल्लाबोल

Prime Minister Modi inefficient in many aspects including economy; Dr. Attack by Parakala Prabhakar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या राजवटी देशाच्या अर्थव्यवस्थेत अनागोंदी माजली आहे. केवळ अर्थव्यवस्थेत नाही तर अनेक बाबतीत पंतप्रधान मोदी अकार्यक्षम ठरले आहेत, असा जबरदस्त हल्लाबोल डॉ. परकला प्रभाकर ( Dr. Parakala Prabhakar)यांनी केला. डॉ. प्रभाकर हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आहेत. त्यांच्या टीकेमुळे देशभर एकच खळबळ उडाली आहे.

 

डॉ. परकला प्रभाकर यांनी ‘द क्रॉकड टिंबर ऑफ न्यू इंडिया : एसेज ऑन अ रिपब्लिक इन क्रायसेस’ (‘The Crooked Timber of New India : Essays on a Republic in Crisis’) हे नवे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी मोदी सरकारच्या कारभाराची अक्षरशः चिरफाड केली. भाजप आणि सरकारकडून केले जाणारे दावे किती पोकळ आहेत, केवळ प्रचारकी आहेत, याचा ऊहापोह डॉ. प्रभाकर यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. पत्रकार करण थापर यांनी ‘द वायर’ या संकेतस्थळाच्या यू-ट्यूब चॅनलला डॉ. परकला प्रभाकर यांची मुलाखत घेतली आहे. अत्यंत स्पष्टपणे डॉ. प्रभाकर यांनी आपले मुद्दे मांडले आहेत.

बारावीचा निकाल ३१ मे ला लागणार, तर १० वीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात

ते म्हणाले,  देशाच्या अर्थव्यवस्थेत अनागोंदी माजली आहे. केवळ अर्थव्यवस्थेत नाही तर अनेक बाबतीत पंतप्रधान मोदी अकार्यक्षम ठरले आहेत.  पंतप्रधान मोदी अनेकबाबतीत अकार्यक्षम असले, तरी काही बाबतीत कार्यक्षम आहेत. समाजात फूट पाडणे, जातीय द्वेष निर्माण होईल असे वातावरण निर्माण करणे, याबाबत मोदी कार्यक्षम आहेत, असा सणसणीत टोला डॉ. प्रभाकर यांनी लगावला.

 

नोटबंदिवर भाष्य करतांना डॉ. प्रभाकर यांनी सांगितले की, कोणत्या अर्थतज्ज्ञाला विचारून नोटाबंदी जाहीर केली?  पंतप्रधान मोदींना कोणते अर्थतज्ज्ञ सल्ला देतात? कोणत्या अर्थतज्ज्ञांचे ऐकून त्यांनी नोटाबंदी जाहीर केली होती? पैसा रोखण्यासाठी नोटाबंदी केली असे ते सांगतात. पण कोणत्याही अर्थतज्ज्ञाला विचारा का पैसा हा रोखीमध्ये असतो का? अशा प्रश्नांचा भडिमार डॉ. प्रभाकर यांनी केला.

 

सरकारचे मंत्री हे तर ‘गॅसलाइट 

केंद्र सरकारचे मंत्री चुकीची माहिती लोकांसमोर ठेवत आहेत. हे मंत्री ‘गॅसलाइट’ आहेत. कोरोना महामारीपूर्वी जो जीडीपी होता तो जीडीपी अद्यापी आपण गाठलेला नाही. अर्थव्यवस्थेबाबत देश सध्या संकटाचा सामना करत आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 

जेटली, सीतारामन यांचे काय?

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अरुण जेटली अर्थमंत्री होते. आता निर्मला सीतारामन आहेत. मग त्यांचे काय? ते दोघेही अकार्यक्षम का? या प्रश्नावर डॉ. प्रभाकर म्हणाले, सरकारचे प्रमुख मोदी आहेत. मोदींचा कार्यकाळ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अर्थव्यवस्थेसह देशात सुरू असलेल्या बऱ्या-वाईट घटनांना मोदीच जबाबदार आहेत.

 

आर्थिक सुधारणांना भाजपने विरोध केला होता

भाजपकडे अर्थव्यवस्थेचे तत्त्वज्ञान सुसंगत कधीच नव्हते. १९८० साली भाजपची स्थापना झाली तेव्हा समाजवादाला विरोध केला. १९९१ च्या नव्या आर्थिक सुधारणांनाही भाजपनेच विरोध केला होता. याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 

महागाई, बेरोजगारीचे प्रश्न गंभीर 

डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ, काही घटकांना अनुदान दिले हे चांगले आहे. पण महागाई, बेरोजगारीचे उग्र प्रश्न आहेत. बेरोजगारीचा दर सात टक्क्यांवर गेला आहे. सरकारी संस्थांचे खासगीकरण मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठा गोंधळ आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी अनागोंदी माजली आहे, असे त्यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!