Just another WordPress site

प्रवीण बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : साहित्य अकादमीच्या २०२२ साठीच्या वार्षीक साहित्य पुरस्कारासाठी मराठी व कोकणी या दोन्ही भाषांतील कादंबऱ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या'(प्रकाशन २०१७) या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. कोकणीसाठी माया अनिल खर्नांगटे यांच्या अमृतवेल या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी १ लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून अकादमीच्या साहित्य अक्षरोत्सवात पुरस्कार प्रदान केले जातील.

दरम्यान प्रमोद मुजूमदार यांना काश्मीरबाबतच्या सलोख्याचे प्रदेश –शोध सहिष्णू भारताचा, या वरिष्ठ पत्रकार सबा नक्वी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत २३ भाषांतील साहित्यकृतींना अकादमी सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला असे अकादमीचे सचिव डॉ के श्रीनिवास राव यांनी सांगितले.

यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये ७ काव्यसंग्रह, ६ कादंबऱ्या, २ कथासंग्रह, ३ नाटके, २ टीकात्मक पुस्तके, प्रत्येकी १ आत्मकथन, लेखसंग्रह व एतिहासिक कथासंग्रहाची निवड करण्यात आल्याचेही डॉ राव यांनी सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक भआलचंद्र नेमाडे, ज्येष्ठ संपादक व खासदार कुमार केतकर आणि प्रा. नितीन रिंढे यांच्या निवड समितीने यंदाच्या मराठी साहित्यकृतीची निवड या पुरस्कारसाठी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!