Just another WordPress site

PM मोदींसाठी भाषण कोण लिहितं अन् हातात कागदही न घेता ते तासनतास कसे काय भाषण देतात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणांसाठीही ओळखले जातात. ‘मन की बात’ असो किंवा इतर काही कार्यक्रम मोदी आपल्या भाषणामधून प्रभाव पाडताना दिसतात.  त्यांच्या भाषणामध्ये शब्दरचना, उच्चारण उत्तम असल्यामुळे त्यांचे भाषण आपल्याला प्रभावी वाटते. मोदींची भाषणं ऐकून अनेकांना ही भाषणं नक्की कोण लिहितं असा प्रश्न पडतो. मोदी स्वत: ही भाषणं लिहितात का, की त्यांना ती कोणी तयार करुन देतं?  ते कोणताही कागद समोर ठेवत नाहीत. मग ते तासन तास कसे काय भाषण देतात? याच विषयी जाणून घेऊया.


हायलाईट्स

१. पंतप्रधान मोदींच्या भाषणाची जगभर चर्चा असते

२. टेलिप्रॉम्पटर वापरत असल्याचा विरोधकांचा आरोप 

३. टेलिप्रॉम्पटरमध्ये बिघाड आल्याने मोदींनी थांबवलं भाषण

४. काँग्रेससह राहुल गांधी यांनी साधला मोदींवर निशाणा 


भाषण देण्याची शैली आणि त्यामध्ये वापरले जाणारे शब्द या दोन गोष्टी मोदींचं भाषण अनेक अर्थांनी खास बनवतात. मोदी आपल्या भाषणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात असं अनेकजण सांगतात. ते इतर नेत्यांप्रमाणे लिहिलेलं भाषण वाचून दाखवत नाहीत. 


पंतप्रधान मोदींसाठी भाषण कोण लिहितं? 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणासंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे विचारणार करणारी माहिती अधिकार याचिका दाखल करण्यात आली होती. या माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना पीएमओ म्हणजेच पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान मोदींच त्यांच्या भाषणाला अंतिम स्वरुप देतात असं स्पष्ट केलं होतं. ज्या पद्धतीच्या कार्यक्रमासाठी भाषण द्यायंच आहे त्यानुसार पंतप्रधान वेगवेगळ्या व्यक्तींना, अधिकाऱ्यांना, संघटना, संस्थांकडून भाषणासाठी माहिती घेतली जाते. या माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या भाषणाचे अंतिम स्वरुप मोदींची निश्चित करतात.


नेहरु स्वत:चं भाषण स्वत:च तयार करायचे

पंतप्रधान  नहरु यांच्यापासून पंतप्रधानांचे भाषण लिहिताना वेगवेगळ्या खात्यांकडून माहिती घेण्याची परंपरा आहे. पंतप्रधानांच्या भाषणाला पक्ष, मंत्री, विषयातील जाणकार, पंतप्रधानांची टीम माहिती एकत्र करुन देते आणि त्या भाषणाला अंतिम स्वरुप दिलं जातं. मात्र,  जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी हे सर्व नेते स्वत:चं भाषणं स्वत: तयार करायचे.

राजकीय नेते व्यासपीठावरून तासनतास भाषण देतात. यावेळी ते कोणताही कागद समोर ठेवत नाहीत किंवा कागद हातात धरून वाचत सुद्धा नाहीत. मग ते नेते तासन तास कसे काय भाषण देतात? 

खरंतर भाषण देताना लोकांच्या नजरेला नजर मिळून भाषण द्यावे लागते. त्यामुळे अनेक जण अशा डिव्हाइसचा वापर करतात. जे समोर असतात. मात्र,  लोकांना याचा काहीही थांगपता लागत नाही.  टेलिप्रॉम्पटरचा वापर करीत असलेली व्यक्ती आपल्याला वाटते की, ती समोरच्या व्यक्तीला बिनधास्त बोलत असते. मात्र, वास्तविक ती व्यक्ती वाचून बोलत असते.


मोदी टेलिप्रॉम्पटरचा वापर करतात का? 

देशात होणाऱ्या लोकसभा निवडणूका असो किंवा गोव्या सारख्या लहान राज्याच्या विधानसभा निवडणूका असो, अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या चेहऱ्यानेच भाजपकडून निवडणूक लढवली जाते. यामध्ये मोदींच्या वक्तृत्व शैलीचा मोठा वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं नेहमी चर्चेचा विषय असतात. मात्र एवढी मोठ-मोठी भाषणं ते नेमकी देतात तरी कशी? तर ते टेलिप्रॉम्पटर वापरत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. 


‘टेलिप्रॉम्पटर’ म्हणजे नेमकं असतं तरी काय?

टेलिप्रॉम्पटर हे एक असं यंत्र असतं, ज्यामाध्यमातून लिहीलेला एखादा मजकूर वाचण्यास मदत होते.  कॅमेरा समोर याचा वापर केला जातो. समोर बसलेल्या व्यक्तीला याची पुसटशी कल्पना नसते. त्यामुळे तुम्ही बिनधास्त समोरचे लिहिलेले वाचून समोर असलेल्या लोकांशी संवाद साधू शकता. अद्ययावत अशा पद्धतीच्या टेलिप्रॉम्टरचा वापर सहसा टिव्ही स्टुडीओमध्ये बातम्या वाचण्यासाठी,  शुटींग दरम्यान एखादी मोठी स्क्रीप्ट वाचण्यासाठी केला जातो.  मात्र मागच्या काही काळात वेगवेगळ्या वक्त्यांनी आपलं वकृत्व प्रभावी वाटावं यासाठीही त्याचा वापर केलेला दिसतो. एखाद्या व्यासपीठावर भाषण करताना त्या व्यक्तिच्या समोर दोन्ही बाजूंना रायटींग पॅडच्या आकाराचे दोन टेलिप्रॉम्टर लावलेले असतात. ज्यामध्ये आपल्याला हवा तो मजकूर टाकून स्क्रोल करता येतो. ज्यामूळे दोन्ही बाजूंच्या टेलिप्रॉम्पटरकडे बघून वाचताना वक्ता लोकांकडे बघून वाचत असल्याचा भास होतो.  या टेलिप्रॉम्पटरचे कंट्रोल स्क्रीन पाहत असलेल्या व्यक्तीकडे असते. टेस्क्टच्या स्पीडला कमी जास्त केले जाऊ शकते.


चालू भाषणात टेलिप्रॉम्पटर बंद


Jokes apart, but the person holding topmost chair in the country, couldn’t even utter a single word as soon as the #Teleprompter went off. This is when oratory skills were considered his biggest forte.

Goes on to show how the whole country was fooled.#TeleprompterPM pic.twitter.com/CUvHeUaQUN

— Mayank Saxena (@mayank_sxn) January 17, 2022

 

आता पुन्हा एकदा काल नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. आंतरराष्ट्रीय दावोस समिटला संबोधित करताना बोलताना अडखळल्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. विरोधकांनी हा व्हिडीओ ट्विट करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. टेलिप्रॉम्पटरने साथ न दिल्याने ही वेळ आल्याचा अनेकांच्या टीकेचा रोख होता. मोदी सोमवारी जागतिक आर्थिक परिषदेच्या  दावोस अजेंडा बैठकीत सहभागी झाले होते.  मोदींच्या भाषणावेळी काही तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीला अडथळा निर्माण झाला. यावेळी अचानक नरेंद्र मोदी यांना भाषण थांबवावे लागले. यावरून राहूल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर निशाना साधला.

इतना झूठ Teleprompter भी नहीं झेल पाया।

— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 18, 2022


हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।#TeleprompterPM

— Congress (@INCIndia) January 17, 2022

      

ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की,  ‘टेलिप्रॉम्पटर सुद्धा इतके खोटे सहन करू शकत नाही.’ तर दुसरीकडे, काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ‘हमे तो टेलिप्रॉम्पटरने लूटा, अपनो में कहा दम था’, असे म्हणत मोदींवर निशाणा साधण्यात आला.  
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!