Just another WordPress site

‘राष्ट्रवादीवाले xxची औलाद’, मनसेच्या अमेय खोपकर यांची अर्वाच्य भाषेत टीका

ठाणे : महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरले. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याचीही मागणीही केली. हा सगळा प्रकार शमतो न शमतो तोच आता मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची जीभ घसरली आहे. राष्ट्रवादीवर टीका करताना त्यांचा तोल ढळला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करताना अपशब्द वापरल्याची बातमी समोर आलीय. खोपकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर खालच्या शब्दांत टीका केलीय. “राष्ट्रवादीवाले xxची औलाद आहेत”, अशा अर्वाच्य भाषेत अमेय खोपकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काल ठाण्याच्या एका मॉलमधील चित्रपटगृहात शिरुन हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद केला होता. यावेळी एका प्रेक्षकाला प्रचंड मारहाण झाल्याचं देखील कॅमेऱ्यात कैद झालं होतं. पण त्या प्रेक्षकाला कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती का? ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
या दरम्यान संबंधित घटनेवर मनसेकडून टीका करण्यात आलीय. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी बंद केलेला शो पुढच्या अर्ध्या तासात मनसे नेते अविनाश जाधव यांनी सुरु केला होता. माजी खासदार संभाजीराजे यांनी हर हर महादेव चित्रपटावर आक्षेप घेतलाय. त्यानंतर राज्यातील सर्व मराठा संघटनांकडून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागलीय. या सगळ्या गदारोळादरम्यान जितेंद्र आव्हाडांनी थेट चित्रपटाचा शो बंद पाडला. त्यानंतर या चित्रपटावरुन मनसे आणि राष्ट्रवादी संघर्ष बघायला मिळाला. आता अमेय खोपकरांची टीका करताना जीभ घसरल्याने या संघर्षात आणखी ठिणगी पडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!