Just another WordPress site

गोवरचा कहर! मुंबईत गोवरमुळे आणखी एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा १८ वर पोहचला

मुंबई : मुंबईत गोवर रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र असतानाच आता आणखीन एका संशयित बालकाचा मृत्यू झाला आहे. मदनपुरा येथे बुधवारी एका नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय. यामुळे मुंबईत गोवरने मृत पावलेल्या बालकांचा आकडा १८ वर पोहचला आहे. तसेच नवे चार रुग्ण सापडले असून रुग्णांची संख्या ५३१ झाली आहे. मृतांच्या संख्येतील तीन मुलं मुंबई बाहेरील होती. तर सहा मुलांना संशयित म्हटले होते.

मुंबईत मदनपुरा परिसरात मृत मुलगा राहत होता. त्याला १२ डिसेंबरला त्रास जाणवू लागला. सुरुवातीला त्याला सर्दी, खोकला, ताप असा त्रास होऊ लागला. त्यावर उपचार सुरु असतानाच त्याला १७ डिसेंबरला अंगावर पुरळ येण्यास सुरूवात झाली. २२ डिसेंबर रोजी त्याच्या संपूर्ण अंगावर पुरळ आली होती. तसेच त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. परिसरात असलेल्या रुग्णालयात त्याला नेले असता पहाटे महापालिका रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर त्याला प्राणवायू यंत्रणा लावण्यात आली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या बालकाला गोवरची लस दिलेली नव्हती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मुंबई (Mumbai) महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाकडे (Hospital) त्याच्या मृत्यूच्या अहवालात कोरोनाने मृत्यू झाल्याचे असले तरी अवलोकन समितीच्या अहवलावर मुलाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. सध्या विविध रुग्णालयात एकूण ९४ रुग्ण उपचार घेत आहेत. यात बुधवारी २३ जणांची भर पडली. तर २६ जणांना घरी सोडण्यात आले. तसेच यातील ३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना प्राणवायू यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. तर ४ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!