Just another WordPress site

No one is claiming Rs 42,000 crore | देशातील बॅंकांकडे पडून आहेत ४८ हजार २६२ कोटी रुपये धुळखात, अद्याप कोणीच केला नाही दावा

पैसा हा लोकांच्या उत्पन्नाचा निदर्शक आणि जीवनमानाचाही मापदंड आहे. म्हणूनच ज्यांच्याकडे पैसा अधिक त्यांचे जीवनमानही उच्च राहते. खिशात पैसा म्हणजे जीवनाला आधार असतो. पैशावाचून अनेकदा अडतं, त्यामुळं एक एक रुपया मिळवण्यासाठी लोक  आयुष्यभर कष्ट करतात. मात्र, कोट्यावधी रुपये कुठंतरी बेवारस पडून आहेत, असं तुम्हाला सांगितलं तर खोट वाटेल. पण हे खरंय. आणि यावर तुमचा विश्वास बसत नसला तरी विश्वास ठेवावाच लागेल. कारण देशातील बॅंकाकडे थोडे-थोडके नाही तर  तब्बल ४८ हजार कोटी रुपये बेवारस पडून असल्याची माहिती समोर आली.



महत्वाच्या बाबी 

१. देशातील बॅंकात ४८ हजार कोटी रुपये पडून

२. पैशांना दावेदारच नसल्याने पैसे बॅंकेकडे धुळखात

३. तुम्ही देखील करू शकता बेवारस पैशावर दावा

४, दावेदार शोधण्यासाठी आरबीआयने राबवणार मोहीम


भारतात मोठ्या प्रमाणात लोकं बँकांमध्ये, म्युच्युअल फंडांमध्ये, इंश्यूरन्समध्ये गुंतवणूक करत असतात. अनेकदा लोक आपण कुठे गुंतवणूक केलीये, हे विसरून जातात तर अनेक लोकांचा मृत्यू होतो. शिवाय अनेकदा त्यांच्या जवळच्या कोणालाच या गुंतवणुकीची माहिती नसते. या मुळेच अशा मालकांची रक्कम बेवारस पडून असते. आज भारतातील अनेक बॅंकामध्ये अशी ४८  हजार कोटींची रक्कम बेवारस पडून आहे.  मात्र, यावर दावा करणारे कुणीच नाहीयेत. अनेक खात्यांमधील मुदत ठेवी मॅच्युअर झाल्या.  मात्र, त्यावर कुणाचेच नॉमिनेशन नाहीये. देशातील अशा प्रकारच्या अनक्लेम्ड रकेमेसाठी बँका आणि रिझव्‍‌र्ह बँकेकडून वेळोवेळी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. मात्र, त्यानंतरही या रकमांवर कोणीही दावा केलेला नसून, अशा प्रकारच्या ठेवींमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. यामुळे अशा ठेवींमुळे आरबीआयची चिंता वाढली.  रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, २०२१-२२ या आर्थिक वर्षात बँकांमधील दावा न केलेली रक्कम ४८ हजार २६२ कोटी रुपये इतकी झाली. गेल्या आर्थिक वर्षात ही रक्कम ३९,२६४ कोटी रुपये होती. आता या बेवारस रकमेचे दावेदार शोधण्यासाठी आरबीआयने मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक त्या ८ राज्यांवर आपले लक्ष केंद्रित केलंय, जिथं दावा न केलेल्या ठेवी सर्वाधिक आहेत. RBI च्या म्हणण्यानुसार, तामिळनाडू, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक, बिहार आणि तेलंगणा-आंध्र प्रदेशच्या बँकांमध्ये सर्वाधिक रक्कम जमा आहे. हक्क नसलेल्या ठेवींमध्ये वाढ होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये बचत खाते आणि चालू खाते बंद न करणं हे एक महत्वाचं कारण असल्याचं सांगण्यात येतं. अनेक बँक खातेदार त्यांना व्यवहार करायचे नसलेले खाते बंद करत नाहीत. मात्र, अशी अनेक खाती आहेत, ज्यात रक्कम तर आहे, मात्र त्याला कुणीचा नॉमिनेशन नाही. तसेच, अनेक खातेदारांच्या मृत्यूनंतर, नामनिर्देशित किंवा कायदेशीर वारसदार पैसे मागण्यासाठी पुढे येत नसल्यादेखील दावा न केलेल्या ठेवींमध्ये वाढ होतेय. देशातील अनेक खाती अशी आहेत ज्यात १०  वर्षांपासून कोणत्याही प्रकरचे व्यवहार झालेले नाही किंवा १० वर्षांपासून या रकमांवर कोणताही दावा करण्यात आलेला नाही. बँकांमध्ये जमा असलेली आणि दावा न केलेली रक्कम डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडात वर्ग करण्यात येते. जर दावा न केलेल्या खात्याची रक्कम डीईएएफ गेली असेल, तर ती परत मिळवण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा लागेल. दावा न केलेल्या ठेवींची माहिती सामान्यत: फक्त बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असते. खातेदाराच्या पॅनकार्ड, जन्मतारीख, नाव आणि पत्ता यावरून दावा न मिळालेली रक्कम खातेदाराच्या खात्यात पडून आहे की नाही, याची माहिती मिळू शकते. दरम्यान, बेवारस पडून असलेल्या या ४८ हजार २६२ कोटी रुपयांना या रकमेचे दावेदार भेटतात की, सरकार ही रक्कम अन्य एखाद्या फंडात वापरणार,  हेचं पाहावं लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!