Just another WordPress site

नवनीत राणा यांचा पाय खोलात; दिवाळी होणार जेलमध्ये साजरी? अटक वारंट जारी; ‘ते’ प्रकरण चांगलच अंगलट

बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरण खासदार नवनीत राणा यांना पुन्हा भोवण्याची चिन्ह आहेत. बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं असून मुलंड पोलिसांना त्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.

 

महत्वाच्या बाबी

१. खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ
२. नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट!
३. कोर्टाचे पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश
४. खासदार नवनीत राणा यांना अटक होणार का?

 

महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी बोगस जात प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिवडी कोर्टात यावर सुनावणी सुरू होती. या सुनावणीवर शिवडी कोर्टाने बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आला.

नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयानं ८ जून २०२१ रोजी रद्द केलं आहे. शिवाय त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळं नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांनी २०१७ च्या निवडणुकीत खोटे जात पडताळली प्रमाणपत्र सादर केल्याचे सांगत त्यांच्या निवडणुकीला आव्हान देत २०१७ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र खोटे असल्याचे त्यांचे म्हणणे होते. या सोबतच जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचाही आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप करत नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवर निर्णय देत नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द केले होते. त्यानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. २२ जून २०२१ रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना दिलासा देत जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. तसेच मुंबई सत्र न्यायालयाने वॉरंट देखील जारी केले होते. दरम्यान, नवनीत राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात या वॉरंट विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर अद्याप सुनावणी झाली नसून ही याचिका प्रलंबित आहे. मुंबई सत्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती न दिल्याने शिवडी कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिल्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झालीय. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंट काढत कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे त्यांना नवनीत राणा यांना अटक होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. ७ नोव्हेंबरला या याचिकेवर पुढील सुनावणी होणार असून तो पर्यंत तरी नवनीत राणा यांना दिलासा मिळणार नाही हे या कारवाईवरून सिद्ध झालंय. दरम्यान, आता मुलुंड पोलीस नवनीत राणांविरोधात अजामीनपात्र वॉरंटवर नेमकी काय कारवाई करतात, आणि
या कारवाईविरुध्द नवनीत राणा नेमकं कोणतं पाऊल उचलणार हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!