Just another WordPress site

National Film Awards : नॅशनल फिल्म अवार्ड्स आज होणार घोषणा, नॅशनल फिल्म अवार्ड्सचा इतिहास काय?

नॅशनल फिल्म अवार्ड्स हे भारतातील चित्रपट क्षेत्रात दिले जाणारे सर्वात महत्त्वाचे पुरस्कार आहेत. आज ६८ व्या  नॅशनल फिल्म अवार्ड्सची घोषणा होणार आहे.  माहिती आणि प्रसारण मंत्रालय हे   नॅशनल फिल्म अवार्ड्सची  घोषणा करणार आहे. दरवर्षी हे पुरस्कार देशातील सर्वोत्कृष्ट निवडक चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित कलाकारांना दिले जातात. याच निमित्ताने हे पुरस्कार नेमके का दिले जातात, त्याची सुरुवात कधी आणि कशी झाली होती? याच विषयी जाणून घेऊ.महत्वाच्या बाबी

१. ६८ व्या नॅशनल फिल्म अवार्ड्स आज होणार घोषणा

२. १९५४ मध्ये झाली नॅशनल फिल्म अवार्ड्सची सुरुवात 

३. पहिला नॅशनल फिल्म अवार्ड्स ‘श्यामच्या आई’ सिनेमाला

४. राष्ट्रपतींच्या हस्ते नॅशनल फिल्म अवार्ड्स प्रदान केल्या जातात

नॅशनल फिल्म अवार्ड्स का आणि कधीपासून दिले जातात?

कला, संस्कृती, सिनेमा आणि साहित्य या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मानार्थ हे पुरस्कार दिले जातात. स्वातंत्र्यानंतर देशातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्कारांची सुरूवात झाली होती.  या पुरस्कारांची सुरुवात करण्यासाठी १९४९ साली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांवर आधारित बनलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड करणं, हे या समितीचे काम होतं. या नॅशनल फिल्म अवार्ड्सची सुरुवात १९५४ साली  झाली होती. चांगले चित्रपट तयार व्हावेत, चांगल्या कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, हा या पुरस्कार देण्यामागचा हेतू आहे.


पहिला पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? 

१९५४ साली नॅशनल फिल्म अवार्ड्सची सुरुवात झाली होती. १९५३ साली बनलेल्या काही उत्तम चित्रपटांची त्यासाठी निवड करण्यात आली होती. पहिल्या नॅशनल फिल्म अवार्ड्स सोहळ्यातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्ण कमळ ‘श्यामची आई’ या चित्रपटाला देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. श्यामची आई हा साने गुरुजी यांनी लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे.. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं  प्रल्हाद केशव अत्रे… तर  माधव वझे, वनमाला आणि दामूअण्णा जोशी या कलाकारांनी यात भूमिका रंगवल्या होत्या..  १९५४ साली या चित्रपटाला भारतीय केंद्रशासनातर्फे दिला जाणारा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता..  तर महाबलीपुरम या Documentary ला Documentary film पुरस्कार मिळाला होता. ही फिल्म जगत मुरारी यांनी दिग्दर्शित केली होती.


कसे निवडले जातात विजेते?

या पुरस्कारांसाठी, प्रथम चित्रपट निर्मात्यांकडून प्रवेशिका मागवल्या जातात, त्यानंतर सरकारकडून दोन्ही पुरस्कारांसाठी स्वतंत्र ज्युरी तयार केल्या जातात. ज्युरी सर्व चित्रपट पाहतात आणि प्रत्येक श्रेणीच्या आधारे अभिनेते आणि चित्रपटांची निवड केली जाते. यामध्ये सुमारे ९० पुरस्कार असून ते विविध श्रेणींमध्ये दिले जातात. यात वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट, विशेष चित्रपट, सर्वोत्तम लेखन, चित्रपट अनुकूल प्रदेश, विशेष उल्लेख इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये चित्रपट आणि कलाकार दोन्ही निवडले जातात.


पुरस्कारात काय मिळते?

नॅशनल फिल्म अवार्ड्समध्ये प्रत्येक श्रेणीच्या आधारावर एक वेगळा पुरस्कार दिला जातो, जो रजत कमल, स्वर्ण कमल म्हणून ओळखला जातो. काही पुरस्कारांमध्ये रोख बक्षीस देखील दिले जाते, तर काही श्रेणींमध्ये फक्त पदक दिले जाते. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्याला स्वर्ण कमल, १० लाख रुपये, सन्मानपत्र आणि शाल देऊन गौरविण्यात येते. स्वर्ण कमल आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या विजेत्याला अडीच लाख रुपये दिले जातात. रजत कमल आणि दीड लाख रुपये अनेक श्रेणींमध्ये दिले जातात. 


कोणाच्या हस्ते होतं पुस्काराचं वितरण?

सामान्यत: हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. मात्र काही वर्षांपासून हे पुरस्कार उपराष्ट्रपती अथवा माहिती आणि प्रसारण मंत्री यांच्या हस्ते दिले जात आहेत. 2021 साली उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!