Just another WordPress site

Money fraud by ATM Clone | अहमदनगरमध्ये एटीएम क्लोनिंगने लाखोंचा गंडा; ८ वी पास आरोपी मास्टरमांइड

अहमदनगर : पेट्रोल पंपावर स्किमर मशीनद्वारे एटीएम क्लोन करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या दोघांसह त्यांच्या मास्टरमाइंडला अटक केली.  तीन महिन्यांपूर्वी एका ग्राहकाचं एटीएम कार्ड क्लोन करून पैसे काढल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. याप्रकरणी पोलिसांनी मास्टरमाइंडला बेड्या ठोकल्या. सुजित सिंग असं अटक केलेल्या मुख्य आरोपीचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. आरोपी सुजित हा केवळ आठवी पास आहे. अन्य दोन आरोपी धीरज अनिल मिश्रा आणि सूरज अनिल मिश्रा हे नगर जिल्ह्यातील आहेत. या दोन आरोपींनी पेट्रोल पंपावर एटीएम कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकाचं एटीएम क्लोन करण्याचा सपाटा लावला होता. दरम्यान एका नागरिकाची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत धीरज अनिल मिश्रा आणि सूरज मिश्रा यांना अटक केली होती. यानंतर आरोपी सूरज यानं पोलीस चौकशीत आरोपी सुजित सिंग यांच्या सांगण्यावरून आपण एटीएम कार्ड क्लोन करत असल्याची माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता मुख्य आरोपी सुजित सिंग वसई विरार येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. सुजित सिंग काही दिवसांपूर्वी आरोपी एका नायजेरिन टोळीच्या संपर्कात आला होता. आरोपीनं त्यांच्याकडून एटीएम क्लोन करण्याचं तंत्र शिकून घेतलं होतं. त्यानंतर त्यानं स्वत:ची टोळी तयार करून अनेकांना गंडा घातला. पोलिसांनी आरोपीकडून एक लॅपटॉप, पाच मोबाइल, एक कॉम्प्युटर, सात पेन ड्राइव्ह, चार स्किमर मशीन एक कलर प्रिंटर, ५४ बनावट एटीएम कार्ड आणि अनेक सीमकार्ड जप्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!