Just another WordPress site

Modi Lifestyle : मोदी किती तास काम करतात? त्यांच्या जेवणाचा खर्च किती? ते कोणता फोन वापरतात? RTIमधून मिळाली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हापासून देशाचे पंतप्रधान झालेत, तेव्हापासून लोकांमध्ये त्यांच्या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ते काय खातात, काय घालतात, त्यांचे सोशल मीडिया अकाउंट कोण हाताळते?  कोणत्या कंपनीचा फोन वापरतात, त्यांचे डेली रुटीन कसे असते? अशा एक ना अनके सर्व गोष्टींबाबत लोकांना माहिती हवी आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्दलच्या त्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या रंजक आहेत.



महत्वाच्या बाबी 

१. पीएम नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर अतिशय सक्रिय 

२. @narendramodi अकाऊंट ते स्वतः मॅनेज करतात

३. पंतप्रधान मोदी स्वतः त्यांच्या जेवणाचा खर्च उचलतात

४. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आयफोन यूज करतात


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असतात. त्यांच्याआधी देशाचे एकही पंतप्रधान सोशल मीडियावर एवढे अॅक्टिव्ह दिसलेले नाही. पीएम मोदी हे फक्त सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नाहीत तर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.त्यामुळे अनेकांना उत्सूकता आहे की पंतप्रधान मोदी त्यांच्या व्यस्ती दिनक्रमातून सोशल मीडियासाठी केव्हा वेळ काढतात? किंवा त्यांचा सोशल मीडिया मॅनेज करण्यासाठी ते किती खर्च करतात? पीएमओ  कार्यालयाने  एका आरटीआयला दिलेल्या उत्तरात सांगितले की,  की मोदींच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काहीही खर्च होत नाही. @PMOIndia नावाने असलेले ट्विटर अकाऊंट पीएमओ हँडल करते, तर @narendramodi या नावाने असलेले अकाऊंट ते स्वतः मॅनेज करतात.याशिवाय, पंतप्रधान मोदींबद्दल, त्यांच्या जेवणाच्या खर्चाविषयी, त्यांच्या जेवणाच्या सवयींविषयाचे काही प्रश्न माहिती अधिकार अर्जातून विचारण्यात आले होते. त्या अर्जाला केंद्रीय माहिती अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं की,  पंतप्रधान मोदी स्वतः त्यांच्या जेवणाचा खर्च उचलतात. म्हणजेच त्यांच्या जेवणावर सरकारचा कोणताही खर्च होत नाही, असं उत्तर आरटीआयमधून मिळालं.पंतप्रधान मोदींना गुजराती जेवण आवडतं. त्यांना आचारी बद्री मीणा यांनी केलेला स्वयंपाक आवडतो. बाजरीची रोटी आणि खिचडी मोदींना सर्वाधिक आवडते. एका आरटीआयमधून मोदींनी घेतलेल्या सुट्ट्यांची माहिती मागण्यात आली होती. त्यावर मोदींनी आतापर्यंत एकही सुट्टी घेतली नसल्याची माहिती पीएमओनं दिली. मोदी किती तास काम करतात, असा प्रश्न एका आरटीआयमधून विचारण्यात आला. त्यावर मोदी इज ऑन ड्यूटी ऑल द टाइम, असं उत्तर पीएमओनं दिलं.  मोदी कोणता फोन आणि इंटनेट वापरतात, याचीही नागरिकांना उत्सूकता आहे. या प्रश्नाच्या उत्तरात पीएमओने म्हटले आहे, की त्यांनीऑफिसकडून कोणताही स्मार्टफोन घेतलेला नाही. मात्र ते आयफोन यूज करतात. तो त्यांचा पर्सनल आहे. पीएमओमधील इंटरनेटचा स्पीड किती असा प्रश्न २०१५ मध्ये एका आरटीआयमधून विचारला गेला. त्याला ३४ एमबीपीएस असं उत्तर देण्यात आलं.


Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!