Just another WordPress site

नाशकात संभाजीराजेंची मिसळ पार्टी; स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना स्वतः मिसळ वाढली…

नाशिक : स्वराज्य प्रमुख संभाजी राजे छत्रपती यांच्या तीन दिवसाच्या नाशिक दौऱ्यानंतर त्यांनी आज कार्यकर्त्यांसोबत मिसळ पार्टी करत तीन दिवसीय दौऱ्याचा समारोप केला श्रमपरिहार म्हणून या मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज आणि स्वराज्य प्रमुख संभाजी राजे छत्रपती हे गेल्या तीन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर होते. गाव तिथे शाखा, घर तिथे स्वराज्य, या संकल्पनेखाली स्वराज्य संकल्प अभियान राबवले जात आहे. याच स्वराज्य संकल्प अभियानासाठी संभाजी राजे तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्वराज्य संघटनेच्या शाखांचे उद्घाटन करत होते. या तीन दिवसात त्यांच्या या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तीन दिवसीय दौऱ्यानंतर कार्यकर्त्यांबरोबर श्रमपरिहार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिकच्या साधना मिसळ येथे मिसळ पार्टीचे आयोजन केले होते.

श्रमपरिहारच्या निमित्ताने आयोजित या मिसळ पार्टीला महाराष्ट्रभरातून आलेले स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आणि नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी साधना हॉटेलचे संचालक राजू आमले यांनी संभाजी राजे यांचा हॉटेलमध्ये स्वागत केले. तर संभाजी राजे छत्रपती यांनी गेली तीन दिवस स्वराज्य संघटनेचा अभियानासाठी धडपड करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या हाताने मिसळ वाढत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संभाजीराजे छत्रपती यांच्या नाशिक दौऱ्याला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला चे चित्र पाहायला मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!