Just another WordPress site

Milestones : कधी विचार केला का? रस्त्याच्या कडेला असलेल्या माइलस्टोन्सवरील रंगेबिरेंगी पट्ट्यांचा नेमका अर्थ काय?

रस्त्याच्या कडेला तुम्ही ‘माइलस्टोन्स’, म्हणजेच किलोमीटर दर्शविणारे दगड बघितलेच असतील, ज्यावर एखाद्या जागेचे अंतर आणि त्या ठिकाणचे नाव लिहिलेले असते. या दगडांचा वरचा भाग पिवळा, हिरवा, काळा आणि नारंगी रंगाने रंगलेला असतो.  तर  खालच्या भागाला पांढऱ्या रंगाने रंगवलेले असते. पण तुम्हाला माहिती आहे का माइलस्टोन्स  हे  वेगवेगळ्या रंगाचे का असतात? या माइलस्टोन्सवर असलेल्या रंगेबिरेंगी पट्ट्यांचा नेमका अर्थ काय असेल?  याच विषयी जाणून घेऊ.


महत्वाच्या बाबी 

१. किमीचे आकडे दाखवण्यासाठी असतात माइलस्टोन्स

२. रस्त्यावरील माइलस्टोन्स हे वेगवेगळ्या रंगाचे असतात

३. पिवळ्या रंगाच्या पट्टीचा अर्थ असतो राष्ट्रीय महामार्ग

४. देशात ३.९३ लाख किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते

नेहमीचा किंवा कामाच्या ठिकाणी जाण्याचा प्रवास असो. रस्त्याच्या कडेला असणारे माइलस्टोन्स  आपण नेहमी पाहत असतो. आपल्या एखाद्या स्थळी जाण्यासाठी अजून किती अंतर कापायचं बाकी आहे, हे या दगडांमुळे कळते. राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग अशा सगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर महत्त्वाच्या ठिकाणांचं अंतर हे दगड दाखवतात. आपल्या देशात ५८.९८ लाख किलोमीटर लांबीचं रस्त्यांचं जाळं आहे. त्यात ग्रामीण मार्गांपासून राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि एक्स्प्रेस वेजचा समावेश आहे. आणि या रस्त्यांवर हे माइलस्टोन्स असतात. आणि त्यावर  पिवळा, हिरवा, काळा आणि नारंगी, असे चार रंग लावलेले असतात.  किलोमीटरचे आकडे दाखवण्यासाठी असणारे हे दगड रंगवण्यामागे खास कारणं आहे. हा प्रत्येक रंग काहीतरी सांगत असतो. पिवळ्या पट्टीचा अर्थ असा की तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत आहात. एका शहातून दूसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी तुम्ही राष्ट्रीय महार्गावरुन प्रवास करत असाल तर तुम्हाला रस्त्याच्या कडेला असलेल्या माहिती सूचकावर पिवळ्या रंगाची पट्टी दिसेल. हे रस्ते देशातली विविध शहरं आणि राज्यांना जोडणारे असतात. २०२१ च्या आकडेवारीनुसार देशात एक लाख ५१ हजार १९ किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. तर रस्त्याच्या कडेला हिरव्या रंगाचे दगड दिसेल की राज्य महामार्ग लागलाय असे समजायचे. हे राज्य महामार्ग तयार करताना दगडावर हिरवे रंग लावले जातात. या रस्त्यांची जबाबदारी संपूर्णपणे राज्य सरकारची असते. रस्त्याने जाताना दगडावर काळ्या, निळ्या आणि पांढऱ्या असे तीन रंग दिसतात. याचा अर्थ आपण मोठ्या शहरात किंवा जिल्ह्यात प्रवेश केला, असा होतो. या रस्त्याची देखभाल महापालिका किंवा जिल्हा प्रशासन करत असते. देशात सध्या पाच लाख ६१ हजार ९४० किलोमीटर्स लांबीचे जिल्हा मार्ग आहेत. तर  नारंगी रंगाचे दगड दिसले की समजायचे आपण गावात आलोय. कारण ऑरेंज स्ट्रिप असलेले माइलस्टोन ग्रामीण भागातल्या रस्त्यांवर असतात. या रस्त्यांची देखभाल प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेद्वारे केली जाते. आपल्या देशात ३.९३ लाख किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते आपल्या देशात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!