Just another WordPress site

पुरुषांनो! तुमच्यामधली स्पर्मची कमतरता दूर करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा, नक्कीच वाढेल Sperm काऊंट

निरोगी जीवनासाठी आणि संतती प्राप्तीसाठी शारीरिक संबंध महत्वाचे आहेत. अनेक दाम्पत्याला मूल होत नाही. याचं कारण म्हणजे महिला किंवा पुरुषांमध्ये असलेली समस्या. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असेल किंवा त्यांची गुणवत्ता चांगली नसेल तर मूल होण्यात अडचण निर्माण होऊ शकते. तणाव, नैराश्य याशिवाय आता लोकांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असल्याच्या तक्रारी अधिक दिसत आहेत. विशेषत: पुरुषांमध्ये. असे म्हटले जाते की, पुरुषांच्या शरीरात दर सेकंदाला १,५०० शुक्राणू तयार होतात. शुक्राणूंची संख्या कमी झाल्याने प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो.

तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही जे खाता ते तुमच्या शुक्राणूंची संख्या प्रभावित करते. तुम्ही जितके चांगले खाल तितके तुमच्या शुक्राणूंची संख्या चांगली राहील. असे काही पदार्थ आहेत जे शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी जबाबदार आहेत जाणून घ्या शुक्राणूंची संख्या वाढवणारे तसेच लैंगिक जीवन सुधारणारे पदार्थ.

 

अश्वगंधा

अश्वगंधा शुक्राणू वाढवण्यासाठी उत्तम आहे. एक ग्लास दुधात अर्धा चमचा अश्वगंधा मिसळा आणि त्याचं नियमित सेवन करा. सुरुवातीला तुम्ही याचं दिवसातून दोनदा सेवन करू शकता. याशिवाय अश्वगंधाच्या मुळाच्या रसही पिऊ शकता.

ऑयस्टर

ऑयस्टर शुक्राणूंची संख्या वाढवतात, कारण त्यात झिंक असते. हे शुक्राणूंचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. तुम्ही दररोज ५० ग्रॅम ऑयस्टर खाऊ शकता

 

खजूर

खजूर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. खजूर खाल्लायने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. पुरुषांसाठी खजूर कोणत्याही औषधी वनस्पतीपेक्षा कमी नाही. पुरुषांनी खजूर खाल्ल्यास त्यांची शारिरीक शक्ती वाढते. कारण खजूरमध्ये कॅलरी, फायबर, प्रोटीन, पोटॅशियम आणि कॉपर यांसारखे पोषक घटक आढळतात. खजूर खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. त्यामुळे पुरुषांनी खजुराचे सेवन जरूर करावे. तुम्ही रात्री दुधासोबत खजूर खाऊ शकता, किंवा दुधात खजूर टाकून ते उकळ्यानंतर ते दूध पिऊ शकता. रात्रभर खजूर पाण्यात भिजत ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी खजूर खावा त्यामुळेही खूप फायदा होतो.

 

अंडी

त्यात प्रथिने सर्वाधिक आढळतात. तसेच व्हिटॅमिन ई देखील असते. या दोन्ही गोष्टी निरोगी शुक्राणूंच्या निर्मितीमध्ये मदत करतात. शुक्राणूंची संख्या वाढवण्याबरोबरच ते मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास देखील मदत करते जे प्रजनन क्षमता कमी करतात.

 

लसून

यामध्ये ऍलिसिन हे दोन पदार्थ पुरुषांच्या लैंगिक अवयवांमध्ये रक्तप्रवाह वाढवतात आणि शुक्राणूंना नुकसान होण्यापासून वाचवतात. दुसरे, सेलेनियम एक अँटिऑक्सिडेंट आहे, ज्यामुळे शुक्राणूंची गतिशीलता वाढते.

 

केळ

केळी लैंगिक आरोग्यासाठी उत्तम आहे. यात ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम असते, जे पुरुषांची कामवासना वाढवण्यास आणि सेक्स हार्मोन्स नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि बी1 मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे पुरुषांच्या शरीरात शुक्राणू निर्माण करण्याची क्षमता वाढते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!