Just another WordPress site

Jaybaf : आपल्या देशातील ‘ही’ तोफ एकदाच चालवली, जिथं तोफगोळा पडला तिथं चक्क तलावच बनला होता!

आपल्‍या देशाला राजे-राजवाड्याची परंपरा आणि इतिहास आहे. इतिहासाच्‍या प्रत्‍येक पानावर पराक्रमाच्‍या आणि शौर्याच्‍या गाथा वाचायला मिळतात. या राजा महाराजांचा इतिहास जेवढा त्यांच्या पराक्रमासाठी चर्चिला जातो,  तेवढीच उत्सुकता त्यांनी पराक्रम गाजवण्यासाठी वापरलेल्या शस्त्रांविषयी असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची गोष्ट असो किंवा टिपू सुलतानच्या तोफेची. या राजा-महाराजांची शान त्यांच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या शस्त्रांनीच होती. राजस्थान येथील एका किल्ल्यात अशीच एक तोफ आहे, जी केवळ एकदाच चालविली गेली. मात्र, तिचा प्रभाव आजही एका तलावाच्या स्वरुपात बघायला मिळतो.

आशियातील सर्वात मोठी तोफ आहे राजस्थानात. १७२६ साली बनविण्यात आलेली ही तोफ जयगड किल्ल्यावर बनवली गेली, त्यामुळे या किल्ल्याच्या नावावरूनच या तोफेचे नामकरण करण्यात आलं. या तोफेला जयबाण तोफ असं नाव देण्यात आलं. आमेरच्या जवळ स्थित असलेल्या जयगड किल्ल्यावर ही तोफ आजही दिमाखात उभी आहे. ही तोफ समस्त आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ म्हणूनही ओळखली जाते. दुसरे सवाई जयसिंह यांनी आपल्या राज्याच्या संरक्षणाकरिता ही तोफ तयार केली होती..  गंमत म्हणजे ती तयार करण्यासाठी तिथे आधी कारखाना बांधण्यात आला. ती तोफ त्या कारखान्यात तयार केली गेली.  या तोफेबद्द्लची सर्वात इंटरेस्टिंग आख्यायिका म्हणजे या तोफेचा पल्ला. काही जण या जयबाण तोफेचा पाच दहा नाही तर तब्बल तब्बल ४० किमी असल्याचं  सांगतात. तर काही तज्ञ या मात्र, तोफेचा पल्ला ११ किमी इतका असू शकतो असे गणिताच्या आधारे मांडतात. खंरतर ही जयबाण तोफ कधीही युद्धात वापरली गेली नाही. आतापर्यंत तिचा केवळ एकदाच वापर झाला. अन् तोही प्रयोगासाठी.  असं सांगितल्या जातं की, जेव्हा या तोफेला चालवण्यात आलं, तेव्हा यामधून निघालेला गोळा हा ३५ किलोमीटर दूर एका गावात जाऊन पडला. त्या आवाजानं आसपासच्या गावांत घबराट पसरली. इतकंच नाही,  तर जिथं तो तोफगोळा पडला, तिथं इतका खोल खड्डा पडला की, तिथं चक्क पाणीच लागलं.  असंही सांगितल्या जातं की,  या तोफेच्या चाचणी वेळी तोफेला चालवणारा सैनिक आणि आणखी ८ सैनिक आवाजाने मेले. याचा आवाज इतका मोठा होता की एक हत्ती सुद्धा हा धक्का पचवू शकला नाही. या तोफेचा पल्ला इतका लांबवर आणि त्यामुळे होणारे नुकसान इतके भयंकर होते, की या तोफेच्या केवळ उल्लेखानेच शत्रूची भीतीने गाळण उडत होती. भव्य अशा या महाकाय  तोफेचं वजन ५० टन आहे. ही तोफ किल्ल्याच्या डूंगर दरवाज्यावर ठेवण्यात आली.  या तोफेची नळीपासून ते शेवटच्या भागाची लांबी ३१ फुट ३ इंच आहे. म्हणूनच जेव्हा या तोफेतून गोळा सुटला तेव्हा तो जयपूरहून ३५ किलोमीटर लांब असणाऱ्या चाकसू नावाच्या क्षेत्रात जाऊन पडला. या तोफेच्या गोळ्याने बनलेल्या तलावात आजही पाणी आहे, हे इथल्या लोकांची पाण्याची गरज भागवत आहे. या तोफेमध्ये ८ मीटर लांब बॅरल ठेवण्याची सुविधा आहे. म्हणूनच ही तोफ आशिया खंडातील सर्वात मोठी तोफ म्हणून प्रसिद्ध आहे. जाणकारांच्या मते ३५ किलोमीटर पर्यंत निशाना साधण्यासाठी या तोफेला १०० किलो गनपावडरची गरज असेल, असं सांगण्यात येतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!