Just another WordPress site

शुभमन गिल तेंडुलकरांच्या नाही तर खानांच्या साराला करतोय डेट? एकत्र असतांनाचा व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री सारा अली खान आणि भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू शुभमन गिल यांच्यातील अफेअरची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. सारा सिनेमांपेक्षा तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे आणि अफेअरमुळे जास्त चर्चेत असते. सध्या तिचं नाव शुभमनशी जोडलं जातंय. सारा आणि शुभमन एका रेस्तराँमध्ये एकत्र जेवताना दिसले होते. त्यानंतर आता ते विमानतळावर पुन्हा एकदा एकत्र दिसून आले.

 

महत्वाच्या बाबी

१. सारा आणि शुभमन गिल यांच्या अफेअरची जोरदार चर्चा
२. विमानतळावर एकत्र दिसले सारा खान आणि शुभमन
३. हॉटेलमध्येही सारा आणि शुभमन गिल दिसले एकत्र
४. लव्हबर्ड्स नेमके कुठे जात आहेत, नेटकऱ्यांमध्ये चर्चा

 

शुभमन गिल सध्या चर्चेत आहेत, तो त्याच्या खेळामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून शुभमन सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला डेट करत असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर तो अभिनेत्री सारा अली खानसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटलं जात होतं. शुभमनच्या वाढदिवसाला त्याच्या एका मित्रानं त्याला शुभेच्छा देताना साराच्या नावाचा उल्लेख केला होता. तेव्हापापसून हे दोघंजण रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. अर्थात त्यावर सारा आणि शुभमन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी साराचा एक फोटो समोर आला होता. या फोटोमध्ये सारा भारतीय क्रिकेटर शुबमन गिलसोबत दिसत होती. हा फोटो समोर येताच सोशल मीडियावर दोघांच्या डेटींगच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता तर शुबमन गिल आणि सारा अली खान हे एकाच हॉटेल मध्ये एकत्र दिसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. सध्या शुभमन आणि सारा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये सारा गुलाबी रंगाचा टँक टॉप घालून हॉटेलच्या लॉबीमधून बाहेर पडताना दिसत आहे. ती बाहेर पडताच, कॅमेरा दुसऱ्या एका व्यक्तीवर जातो ती व्यक्ती शुभमन असल्याचा तर्क सोशल मीडियावर लावला जातोय. ते एकत्र या हॉटेलमध्ये होते का यावर दोघांनीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय. काहीजण सुरुवातीला ही सारा नाहीच असेही म्हणत होते पण… दुसऱ्या व्हिडीओमध्ये सारा आणि शुभमन यांना फ्लाइटमध्ये एकत्र पाहिल्याचा दावा केला जातोय. सारा फ्लाइटमध्ये चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसते आणि नंतर तिच्या सीटवर जाते. त्यामुळे व्हिडीओमध्ये सारासोबत असणारा व्यक्ती शुभमन असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे

काही दिवसांपूर्वी शुभमन आणि सारा तेंडुलकरचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या चर्चा त्या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे रंगल्या होत्या. आता शुभमन सारा अली खानला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. त्यांचे एकत्र फिरतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या दोघांच्या विमान प्रवासाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला. हे फोटो, व्हिडिओ पाहून लव्हबर्ड्स नेमके कुठे एकत्र जात आहेत, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये होऊ लागली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!