Just another WordPress site

पॅन आधार कार्डशी लिंक केलंय का? उशीर केल्यास भरावा लागणार दहा हजाराचा दंड, IT कडून अलर्ट

पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही महत्त्वाची सरकारी कागदपत्रं प्रत्येक व्यक्तीकडे असणे गरजेचे आहे. ओळखीचा पुरावा असण्यासोबतच अनेक ठिकाणी या कागदपत्रांचा उपयोग होतो. तसेच, सरकारने PAN आणि Aadhaar Card लिंक करणे अनिवार्य केले आहे. तुम्ही जर आतापर्यंत ही दोन्ही कागदपत्रं लिंक केली नसल्यास ३१ मार्च ही शेवटची तारीख आणि शेवटची संधी आहे
यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. थेट १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचा अलर्ट आयकर विभागानेच जारी केला आहे.

आयकर विभागाने मार्च २०२३ पर्यंत पॅन-आधार लिंक करण्याची मुदत दिली. त्यासाठी तुम्हाला दंड भरून ही कागदपत्र लिंक करता येणार आहेत. जर तुम्ही त्यांना अजून लिंक केलं नसेल, तर नक्की करा. कारण, ही शेवटची संधी आहे. यानंतर पॅन-आधार लिंक करण्याची तारीख वाढवण्यात येणार नाही. ३१ मार्च २०२३ पर्यंत पॅन-आधार लिंक करणं बंधनकारक असल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे. त्यापूर्वी लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करा. ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक न केल्यास पॅन कार्ड रद्द समजण्यात येईल आणि ते ‘निरुपयोगी’ होईल. कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा इतर कामात याचा पुन्हा वापर करता येणार नाही.
१ जुलैपासून पॅन आणि आधारकार्ड लिंक करण्यासाठी १ हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. मार्च २०२३ पर्यंत ही पेनल्टी १००० रुपये असणार आहे. मात्र त्यानंतर जर तुम्ही पॅनकार्ड आधारला लिंक करायचा प्रयत्न केला तर होणार नाही. शिवाय तुमचं पॅनकार्ड डिअॅक्टिव्हेट होईल. ते इनव्हॅलिड दाखवलं जाईल

पॅनशी आधार लिंक करणे का आवश्यक आहे?

जर पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंड, डिमॅट खाते, बँक खाते उघडणे यासारखी कामे करू शकणार नाही, कारण या सर्वांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. आधार आणि पॅन कार्ड लिंक न केल्यामुळे पॅन कार्ड लॉक झाले असेल, तर तुम्ही अशा कोणत्याही सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही जिथे पॅन कार्ड अनिवार्य आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर हे काम लवकर पूर्ण करा.

पॅनशी आधार लिंक कसं करायचं?

पॅन कार्ड वैध राहण्यासाठी कागदपत्रं त्वरित लिंक करणे गरजेचे आहे. त्यासाठी
१) जर तुमचं अकाउंट तयार झालेलं नसेल तर सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करा.
२)आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या ई-फाइलिंग बेवसाईटवर जा.
३) तुमच्या PAN कार्डवर कोणी लोन तर घेतलं नाही? कसं चेक करायचं
४)वेबसाईटवर ‘लिंक आधार’ ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
५)लॉगइन केल्यानंतर तुमच्या अकाउंटच्या प्रोफाइल सेटिंगमध्ये जा.
६)प्रोफाइल सेटिंगमध्ये तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा ऑप्शन दिसेल. तो सिलेक्ट करा. तिथे दिलेल्या सेक्शनमध्ये आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा.
७) सर्व माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या ‘लिंक आधार’ ऑप्शनवक क्लिक करा. त्यानंतर तुमचं आधार आणि पॅन कार्ड लिंक होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!