Just another WordPress site

पिंपरी चिंचवडमध्ये पूर्व वैमनस्यातून तरुणावर तलवार आणि कोयत्याने वार करून हत्या

पुणे : पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आलीये. चिखली येथील बैलगाडा घाटात किरकोळ कारणावरून एका बावीस वर्षीय तरुणाची कोयता आणि तलवारीने वार करून हत्या करण्यात आलीये. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. सुरज उर्फ सोन्या संदीप शिंदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणात चार आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्याचा मित्र सुरज उर्फ सोन्या संदीप शिंदे हा चिखली येथील बैलगाडा शर्यत घाटातील महादेवाच्या मंदिराजवळ गप्पा मारत बसला होता. यापूर्वी सोन्या शिंदे याचा आरोपी आदित्य पाटोळे याच्यासोबत काही कारणांमुळे वाद झाला होता. जुन्या भांडणाच्या कारणातून सोन्या आणि त्याचा मित्र जिथे गप्पा मारत होते, तिथं आरोपी आदित्य पाटोळे, विशाल पवार, गणेश लोंढे, आणि लालू यादव हे आले. त्यांनी काही कळण्याच्या आतच सुरज उर्फ सोन्या संदीप शिंदे याच्यावर कोयत्याने आणि तलवारीने सपासप वार केले. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी चिखली पोलिसांनी आदित्य पाटोळे, विशाल पवार, गणेश लोंढे, आणि लालू यादव या चार आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!