Just another WordPress site

७ व्या मजल्यावर लिफ्ट तुटली, ७ मजुरांचा मृत्यू

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एक अत्यंत भयानक दुर्घटना घडली आहे. गुजरात विद्यापीठाजवळ एस्पायर-२ नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. निर्माणाधीन असलेल्या या इमारतीच्या सातव्या मजल्यावर लिफ्ट तुटली. त्यामुळे या सात मजुरांचाजागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींना अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.
ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी मजूरांना तात्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींपैकी एका मजदूराची प्रकृती अधिक गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
ही १३ मजली इमारत आहे. मृत्यू पावलेले सर्व मजदूर आठव्या मजल्यावर होते. लिफ्टची केबल तुटली. त्यामुळे सर्वजण सातव्या मजल्यावर कोसळले. त्यात त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!