Just another WordPress site

Dwarf people : जुळ्यांचे गाव, झोपाळूंचे गावाविषयी तुम्ही ऐकलं असेल; आता बुटक्यांच्या गावाविषयी घ्या जाणून

खरंतर बुटकं असणं याकडे आपली लोकं खूप तुच्छतेने किंवा मस्करीच्या नजरेतून बघतात. त्यामुळे बुटकं असणं ही नैसर्गिक कमतरता आहे याकडे लक्ष न देता लोकं सरळ बुटक्या माणसांची खिल्ली उडवतात. आजवर तुम्ही जुळ्यांचे गाव, झोपाळूंचे गावांविषयी वृ्त्तपत्रांमध्ये कधी काही वाचलं असेल. मात्र, याच अनुषंगाने असलेली ही बातमी ऐकल्यावर तुमच्या मनात ‘ऐकावं ते नवलच’ अशी प्रतिक्रिया उमटल्या शिवाय राहणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, चीनमध्ये एक असं गाव आहे, जिथे फक्त बुटके लोक राहतात. चीनच्या शिचुआन प्रांतातील यांग्सी नावाच्या गावातील बुटक्या लोकांची लोकसंख्या जवळपास ५० टक्के आहे.

चीन मधील शिचुआन प्रांतातील यांग्सी गावाची गोष्ट काही वेगळीच आहे. या गावातल्या नागरिकांची उंची  वाढत नाही. या लोकांची उंची २ फूट १ इंच पासून ते ३ फूट १० इंच इतकी आहे. या गावातील जवळपास ५० टक्के लोकसंख्या बुटकी आहे. यापैकी कोणत्याच व्यक्तीची उंची दोन ते तीन फुटांपेक्षा अधिक वाढलेली नाही.  या भागात बुटक्या लोकांना पहिल्यांदा पाहिल्याची बातमी १९११ साली पुढे आली. मात्र, जेव्हा या गावामध्ये आलेल्या भयानक रोगामुळे अंग छोटे होण्याची तक्रार येथील स्थानिकांनी प्रशासनाकडे केली!  तेव्हा खऱ्या अर्थाने हे गाव आणि येथील समस्या जगापुढे आली. नंतर १९८५ मध्ये जेव्हा जनगणना झाली तेव्हा गावात अशी ११९ प्रकरणे समोर आली. या गावात जन्मलेले नागरिक जन्मतः आरोग्यपूर्ण असतात. पाच ते सात वर्षांपर्यंत त्यांची वाढ सामान्यपणे होते. मात्र, या वयानंतर त्यांची उंची वाढणं थांबतं. या वयानंतर तिथल्या व्यक्तींची उंची वाढून जास्तीत जास्त ३ फूट १० इंचांपर्यंत जाते.  बहुतांश नागरिक हा शाप  असल्याचं मानतात. त्यामुळे यांग्सी हे गावच शापित असल्याचं मानलं जातं. यामुळेच तिथल्या नागरिकांची उंची वाढत नसल्याचं बोललं जातं. या गावाच्या परिसरातले नागरिकदेखील हा वाईट शक्तींचा प्रकोप असल्याचं मानतात.  सर्वात आधी १९५१ मध्ये या गावात एका गंभीर आजाराने थैमान घालतं होतं. त्यानंतर सर्वांची स्थिती विचित्र झाली होती. या गंभीर आजाराचा गावातील लोकांवर इतका प्रभाव झाला की, गावात जितके बाळ जन्माला आलेत त्यांची उंची खुंटली. त्यानंतर या गावात इतके लोक कमी उंचीचे का आहेत? याचा शोध घेण्यासाठी अनेक संशोधकांनी वातावरण, पाणी आणि मातीवर रिसर्च केले. मात्र,  त्यांच्या हाती ठोस असं काही लागलं नाही. संशोधकांच्या मते, गावातल्या मातीत पारा अधिक आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांची उंची पुरेशा प्रमाणात वाढत नाही. तर जपानने चीनच्या दिशेनं विषारी वायू  सोडला होता. या विषारी वायूच्या प्रभावामुळे या गावात बुटकेपणाची समस्या निर्माण झाली, असं काही जणांचं मत आहे. तर इथे राहणाऱ्या काही लोकांचं म्हणणं आहे की,  पूर्वजांचा योग्यप्रकारे दफनविधी न केल्याने असं होतं.  मात्र खरं कारण अजूनही लोकांसमोर येत नाहीये. काळानुसार हा आजार थांबला नाही, तर पिढ्यानपिढ्या हा आजार वाढतच गेला. या आजाराला घाबरून लोक गाव सोडून जाऊ लागले, कारण त्यांना वाटत होतं की हा रोग आपल्या मुलांना होऊ नये. आज इतक्या वर्षानंतर काहीसा सुधार झालाय. मात्र अजूनही आताच्या नवीन पिढीमध्ये बुटकेपणाची लक्षणे दिसून येतात. याचं नेमकं उत्तर अद्याप कोणीही देऊ शकलेलं नाही. आश्चर्याची बाब म्हणजे इथे परदेशी लोकांना जाण्यास मनाई आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!