Just another WordPress site

उभं राहून पाणी पिणाऱ्यांनो, वेळीच सावध व्हा! उभं राहून पाणी पिण्याच्या सवयीमुळं होतील ‘हे’ गंभीर आजार

पाणी (Water) हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. आपल्या शरीराचा बहुतांश भाग हा पाण्याने बनलेला असतो. त्याचप्रमाणे शरीराचं कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी पुरेसं पाणी (Enough water) पिण्याची आवश्यकता असते. आरोग्यतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, दररोज किमान ८ ग्लास पाणी पिणं कुठल्याही प्रौढ पुरुष आणि स्त्रीसाठी गरजेचं असतं. पाण्याचं प्रमाण जितकं महत्त्वाचं असतं, तितकीच पाणी पिण्याची पद्धतही महत्त्वाची असते. चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्याचे आरोग्यावर वेगवेगळे दुष्परिणाम होत असतात. आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात अनेकजण उभ्यानेच पाणी पितात मग ते ऑफीस असो घर असो किंवा प्रवासात पाणी पिणे ही खूप सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र वेळीच ही सवय मोडणे आरोग्यासाठी योग्य ठरेल. कारण उभं राहून पाणी पिल्यास आरोग्यावर विपरित परिणाम होतो. जाणून घेऊया, उभ्याने पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होऊ शकतात.

सांधेदुखी

उभ्यानेच आणि घाईघाईने पाणी पिण्याच्या सवयीमुळे तुम्हाला सांधेदुखीचा म्हणजेच आर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो. शरीराच्या सांध्यांतील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते. त्यामुळे अचानक क्रॅम्प येणे किंवा सांधे दुखणे यासारख्या लक्षणांपासून या आजाराची सुरुवात होते आणि मग हा सांधेदुखीचा त्रास आयुष्यभराचा सोबती होतो.

पचनाचे विकार

जेव्हा तुम्ही उभ्याने पाणी पिता तेव्हा ते थेट अन्ननलिकेद्वारे पोटात जाते. उभ्याने पाणी प्यायल्यास पाणी थेट अन्ननलिकेच्या स्थायूंवर दाब टाकते. त्यामुळे उभं राहून पाणी प्यायल्यास पचनप्रक्रियेत समस्या निर्माण होऊन पचनाचे विविध विकार जडू शकतात.

तहान भागत नाही

उभं राहून पाणी प्यायल्याने तहान कधीच पूर्णपणे भागत नाही. उभं राहून पाणी प्यायल्यास तुम्हाला सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावेसे वाटते. त्यामुळेच निवांत एक जागी बसून पाणी प्यायल्यास तहान पूर्णपणे भागते.

शरीरातील आम्ल पदार्थांचे प्रमाण कमी होत नाही
आयुर्वेदामध्ये नमूद केल्याप्रमाणे पाणी उभ्याने आणि घाईघाईमध्ये पिऊ नये. पाणी शांतपणे बसून प्यावे. असे केल्यास शरीरामधील आम्लाच्या (अॅसिडच्या) प्रमाणात समतोल राखला जातो. उभ्याने पाणी प्यायल्यास शरीरातील इतर द्रव्यांबरोबर ते मिसळत नाही. या उलट बसून पाणी प्यायल्यास ते योग्य प्रमाणत शरीरातील आम्ल पदार्थांबरोबर मिसळून त्या पदार्थांचे शरीरातील समतोल राखण्यास मदत करते.

जळजळीचा त्रास

उभ्याने पाणी प्यायलेले ते अन्ननलिकेच्या खालील भागावर जोरदार आघात करते. त्यामुळे पोट आणि अन्ननलिकेला जोडणाऱ्या स्थायूंवर दाब पडतो आणि त्याला इजा पोहचण्याचा धोका असतो. त्यामुळे पोटात जळजळ होण्याचा त्रास होतो. तसेच पाणी पोटात वेगाने येत असल्याने आम्लाची हलचाल वेगावल्याने अॅसिडीटीचा त्रास होतो.

फुफ्फुसांचं नुकसान

जेव्हा तुम्ही उभं राहून पाणी पिता, तेव्हा आवश्यक ते पोषक घटक आणि जीवनसत्त्वं ही तुमच्या पचनसंस्थेत नीटपणे पोहोचत नाहीत. पाण्यासह हे सर्व घटक प्रमाणापेक्षा जास्त वेगाने तुमच्या सिस्टीममधून प्रवास करतात. त्यामुळे आपलं हृदय आणि फुफ्फुसं यांच्यावर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. उभ्याने पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनचा स्तर वरखाली होत असतो.

किडणीसंबंधी विकार

आपण जेव्हा बसलेल्या अवस्थेत असतो, तेव्हा आपली किडणी सर्वाधिक क्षमतेने काम करत असते, असं आतापर्यंत वेगवेगळ्या संशोधनातून दिसून आलं आहे. जेव्हा आपण उभ्याने पाणी पितो, तेव्हा ते पाणी फिल्टर न होता थेट पोटाच्या खालच्या भागात निघून जातं. त्यामुळे पाण्यातील अशुद्ध घटक मूत्राशयात जमा होतात. त्यामुळे पोट साफ करण्याच्या प्रक्रियेतही अडथळे येऊ लागतात आणि किडणीवर तणाव येतो. त्यामुळे मूत्राशयाशी संबंधित विकार जडण्याची शक्यता असते.

पाणी पिण्याची योग्य पद्धत

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, बसून पाणी पिणे सर्वोत्तम मानले जाते. तुम्ही मांडी घालून जमिनीवर बसू शकता आणि खुर्चीवर बसूनही पाणी पिऊ शकता. पाणी पिताना ताठ बसा आणि हळूहळू पाणी प्या. त्यामुळे पोटही फुगणार नाही आणि इतर विकार दूर राहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!