Just another WordPress site

काळा पैसा बाळगणाऱ्यांची गय नाही; नोटबंदीच्या निर्णयावर फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis Reaction on 2000 rupee note : RBI ने २००० रुपयांची नोट (2000 rupee note) चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका करत मोदी सरकारला (Modi government) अडचणीत आणले आहे. सत्ताधाऱ्यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या निर्णयाचे जोरदार समर्थन करत पांढरा पैसा बाळगून असणाऱ्यांना सरकारच्या या निर्णयामुळे चिंतीत होण्याचे कारण नसल्याचं नसल्याचे स्पष्ट केले.

फडणवीस यांनी आरबीआयच्या निर्णयावर बोलतांना सांगितले की, RBI ने २००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या की, ही नोट अजूनही कायदेशीर आहे. या दोन हजाराच्या नोटेला अद्याप बेकायदेशीर ठरवले नाही. यासाठी रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबरची मुदत दिली आहे. या नोटा तुम्ही ऑक्टोबरपर्यंत बदलून घेऊ शकता, असे फडणवीस म्हणाले.

ते म्हणाले की, कायदेशीर नोटा असणाऱ्यांना आणि पांढरा पैसा असणाऱ्यांना या निर्णयाची धास्ती घेण्याची गरज नाही. पण जर कोणी काळा पैसा जमा केला असेल तर तो बदलतांना त्यांना नक्कीच त्रास होणार आहे. त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले? याचा खुलासा त्यांना करावा लागेल, असं फडणवीसांनी सांगितले.

या नोटबंदीचा फायदा असा होईल की, आयएसआय नेहमी बनावट चलनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते. अशा निर्णयांमुळे त्यांच्या प्रयत्न हाणून पाडल्या जाईल आणि फेक करन्सीला आळा बसले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RBI चा नेमका निर्णय काय?
काल RBI ने दोन हजारांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. यापूर्वी २०१६ मध्ये पीएम मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यांच्या जागी ५०० आणि २ हजारच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांची नोट चलनातून काढून घेतली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार, देशातील सर्वसामान्य नागरिकांना २३ मे ते २० सप्टेंबर या चार महिन्यांत त्यांच्या २००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्या लागतील किंवा बदलून घ्याव्या लागतील. अर्थात तोपर्यंत २००० च्या नोटा चलनात राहतील आणि व्यवहार करता येतील.

विरोधकांच्या प्रतिक्रिया
काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय बालिश असल्याची टीका केली, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली. मोदी सरकारचा हा निर्णय धरसोडपणाचे सांगत असले निर्णय हे देशाला परवडणारे नसतात, असं राज ठाकरे म्हणाले. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या निर्णयावरून मोदींची खिल्ली उडवली. पंतप्रधान हा शिकेल-सवरेल असावा, अडाणी पंतप्रधानाला काही कळत नसतं, मात्र त्याचा त्रास सामान्य लोकांना होतो, असं केजरीवाल म्हणाले.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!