Just another WordPress site

Chandrakant joshi । ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांचे निधन; कलासृष्टीत हळहळ


कोल्हापूर : ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक, चित्रकार व कलामहर्षि बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत दत्तात्रय जोशी यांचे आज निधन झाले.  वयाच्या ७७ व्या वर्षी एका खाजगी रुग्णालयता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सूत्रधार या हिंदी व टक्कर या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले.  प्रसिद्ध अभिनेते ऋषीकेश जोशी यांचे चे वडील होत. त्यांच्या जाण्याने कलासृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. 

शाहू स्मारक भवनात सुरू असलेल्या सुमित्रा भावे स्मृती महोत्सवात ते व्यस्त होते, दरम्यान काल, रविवारी त्यांना अचानक रक्तदाबाचा त्रास होवून चक्कर आल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण ब्रेन हॅमरेज झाल्याने ते कोमात गेले, अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत ते दर्जेदार चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहिले. त्यांनी कला शिक्षक म्हणून ४० वर्ष सेवा केली. शिवाजी विद्यापीठ संगीत नाट्यशास्त्र विभागाचे समन्वयक म्हणूनही त्यांनी काम केले. कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सूरू करण्याची संकल्पना त्यांची होती. कोल्हापूरच्या सिने आणि कलासृष्टीचा चालत बोलता इतिहास आणि जगभरातील समांतर, कलात्मक आणि वेगळा विचार मांडणाऱ्या चित्रपटांना फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवणारे चंद्रकांत जोशी यांच्या निधनाने सिने-सांस्कृतिक चळवळीची न भरून निघणारी हानी झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!