Just another WordPress site

१५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस नाही, हा काळा दिवस म्हणून साजरा करा; संभाजी भिडे पुन्हा बरळले, राष्ट्रगीतावरही आक्षेप

Sambhaji Bhide : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे (Shiv Pratishthan Association) संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. १५ ऑगस्ट (August 15) हा आपला स्वातंत्र्य दिवस (Independence Day) नाही. या दिवशी देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करावा, लोकांनी उपवास करावा, असे भिडे म्हणाले. (Celebrate August 15th as Black Day, not Independence Day; Controversial statement of Sambhaji Bhide)

स्वातंत्र्य दिनाबरोबरच संभाजी भिडे यांनी देशाचे राष्ट्रगीत,राष्ट्रध्वजावरही आक्षेप घेतला आहे. भिडे म्हणाले १५ ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नाही, या दिवशी फाळणी झाली होती. त्यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाई सारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल, असे भिडे म्हणाले.

पुण्यातील दिघी येथे शिवप्रतिष्ठान संघटनेकडून रविवारी (२५ जून) संभाजी भिडेंचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. भिडे म्हणालेजन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते१८९८ मध्ये इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी हे लिहिले होते. १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली. या दिवशी सर्वांनी उपवास कारावा आणि दुखवटा पाळावा. त्याचबरोबरभारताचा राष्ट्रध्वज जोपर्यंत भगवा होत नाही, तोपर्यंत शांत बसायचं नाही.

दरम्यान यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे, आपल्या सगळ्यांच्या मनात हे शल्य आहे, भारताची फाळणी झाली, विभागणी झाली. मात्र भारताला राजकीय स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ लाच मिळालेले आहे. आपल्याला अखंड भारत पाहायचा आहे. अखंड भारत होईल, तेव्हाच समाधान होणार आहे. पण याचा अर्थ १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिवस नाही, म्हणत असेल तर ते योग्य नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!