Just another WordPress site

Arpita Mukherjee : ईडीच्या कारवाईत जिच्या घरी सापडलं २० कोटींचं घबाड, ती अर्पिता मुखर्जी कोण आहे?

महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगालमध्येही  शिक्षक भरती घोटाळा उघड झाला. या बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्याचे धागेदोरे आता राज्य सरकारपर्यंत जाऊन पोहोचले. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री असलेले पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. यात जवळपास २० कोटी रुपये रोकड जप्त करण्यात आली.  त्यामुळे अर्पिता मुखर्जी कोण आहेत? याच विषयी चर्चा रंगलीये. महत्वाच्या बाबी 

१. पश्चिम बंगालमध्ये ईडीची मोठी कारवाई

२. TMC मंत्र्याच्या निकटवर्तीयाच्या घरी छापा

३. ईडीकडून जवळपास २० कोटी रुपये जप्त 

४. कारवाईमुळे बॅनर्जी सरकारची धाकधूक वाढली ईडीच्या छापेमारीमुळे चर्चेत आलेल्या अर्पिता मुखर्जी बांग्ला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होत्या.  त्यांनी बांग्ला चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार प्रोसेनजीतसोबत काही चित्रपटात साइड रोल केले.  या शिवाय अर्पिताने बांग्ला चित्रपट अमर अंतरनाड मध्ये देखील अभिनय केलाय. आपल्या करिअरमध्ये अर्पिताने अधिकतर साइड रोलच केले. बांग्ला चित्रपटाशिवाय ओडिया आणि तमिळ चित्रपटात तिने काम केलंय. तृणमूल काँग्रेसमधील जेष्ठ नेते पार्थ चटर्जी यांची अर्पिता निकटवर्तीय मानली जातेय. पार्थ हे ममता बॅनर्जी सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत. पार्थ चॅटर्जी आणि सिनेमात साईड रोल करणारी अर्पिता यांची ओळख कशी झाली हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पश्चिम बंगालमधील महत्त्वाचे नेते असलेले पार्थ चटर्जी हे एक दुर्गापूजा मंडळ चालवतात. त्यांच्या मंडळाकडून दरवर्षी मोठ्या थाटामाटात दूर्गापूजा सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. कोलकात्यातील नामांकित दूर्गापूजा मंडळांपैकी हे मंडळ आहे. २०१९ आणि २०२० अशी दोन वर्षं अर्पिता मुखर्जी या पार्थ चटर्जींच्या दूर्गापूजा सोहळ्याचा चेहरा बनल्या होती.. विविध पोस्टरवर तिचा फोटो झळकला होता आणि त्या माध्यमातून चटर्जी यांच्याशी त्यांची ओळख झाली. चटर्जी हे या मंडळाचे अध्यक्ष होते आणि मुखर्जी या मंडळाच्या एक प्रकारे ब्रँड अम्बेसेडर म्हणून कार्यरत होत्या.  तेव्हापासून या दोघांची ओळख झाली. दरम्यान,  ईडीच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगाल स्कूल सेवा आयोग आणि प्राथमिक शिक्षा बोर्डात झालेल्या भरती प्रक्रियेतील घोटाळ्याच्या चौकशीसाठी अर्पिताच्या घरावर छापे टाकले होते. खडगपूर कॅपच्या सीआरपीएफ जवानांसह ईडीच्या ८० ते ९० अधिकाऱ्यांनी एकाच वेळी १४ ठिकाणी छापे टाकले होते. संध्याकाळपर्यंत कोट्यवधी रुपयांची रक्कम हाती आली. अर्पिता मुखर्जीच्या घरात ११ तास छापा टाकला गेला. या घरात दोन बॅग सापडल्या, ज्यात मोठ्या प्रमाणात रक्कम होती. ईडीला या दोन बॅगांमधून २ हजार रुपयांच्या नोटा मिळाला.  ईडीच्या कारवाईत अर्पिताच्या घरी २० कोटी रोकड सापडल्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले.. विशेष म्हणजे या सर्व नोटा अगदी नव्या कोऱ्या होत्या. शिक्षक भरती घोटाळ्यात ही कारवाई करण्यात आल्याचं केंद्रीय तपास यंत्रणांनी सांगितले. दरम्यान, आता या नव्या धाडसत्रामुळे ममता बॅनर्जी सरकार कोंडीत सापडणार का?  हेचं पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!