Just another WordPress site

मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती, फडणवीसांचा नेमका डाव काय?

मुंबई : मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत विशेष पोलिस आयुक्त हे पद नव्यानेच निर्माण करण्यात आले आहे. यापूर्वी मुंबईसाठी फक्त पोलिस आयुक्त पद होते. देवेन भारती हे मुखमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. यामुळे आता फक्त भारती यांच्यासाठी व मुंबईवर आपले नियंत्रण राहावे, यासाठी हे पद निर्माण करण्यात आले आहे का? अशी चर्चा होत आहे.

देवेन भारती हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आणि मर्जीतले अधिकारी समजले जातात. यामुळेच नव्याने, पहिल्यांदाच मुंबईसाठी विशेष पोलिस आयुक्तपद निर्माण करून त्यांना या पदावर आणले गेले आहे, अशी चर्चा आहे. विशेष पोलिस आयुक्तपदासाठी, थेट शासनाच्या वतीने आदेश काढण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!