Just another WordPress site

भाजपच्या मेळाव्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर; अनिल देशमुखांचा आरोप

Anil Deshmukh on BJP : नागपूर जिल्ह्यातील पारडसिंगा येथे भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली महिला मेळावा (BJP Mahila Melawa) बुधवारी आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रत्येक ग्रामपंचायतीतून १०० महिला आणण्याचे टार्गेटचे ग्रामसचिवांना लेखी आदेश देण्यात आले. या महिलांच्या वाहतुकीचा खर्च ग्रामपंचायतीच्या स्व-खर्चातून करण्याचे आदेश देण्यात आले. हा एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमासाठी शासकीय यंत्रणा तसेच पैशांचा गैरवापर करण्यात आला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली.

Lok Sabha Election : ‘महायुती’ की ‘महाविकास आघाडी?’ राजू शेट्टींनी खरं काय ते सांगूनच टाकलं 

सिव्हिल लाईनमधील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदे आ. देशमुख म्हणाले की, भाजपाच्या वतीने आयोजित या महिला मेळाव्याला मोठया संख्येने महिलांची उपस्थिती दाखवण्याकरिता शासकीय यंत्रणांचा गैरवापर तर करण्यात आलाच परंतु ग्रामपंचायतीच्या खर्चातून महिलांना भाजपाच्या मेळाव्यात नेण्याचा आदेशच देण्यात आला. काटोल येथील गट विकास अधिकाऱ्यांनी त्याबाबतचे पत्र ग्रामसचिवांना पाठविले. महिलांना मेळावास्थळी नेण्याची आणि आणण्याची जवाबदारी सचिवांवर सोपविताना त्याचा खर्चसुध्दा ग्रामपंचायतीने करावा, असे या पत्रात स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.

डायमंडला ५० हजार कोटी देता, पांढऱ्या सोन्याकडे मात्र दुर्लक्ष; केंद्र सरकारच्या भूमिकेवर आंबेडकरांचा प्रहार 

इतक्यावरच हा प्रकार थांबला नाही तर मोठया प्रमाणात महिला त्या मेळाव्यात याव्या, यासाठी भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून बैठकासुध्दा घेण्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या संदर्भात आपण राजशिष्टाचार विभागाला तक्रार केली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीसुध्दा केल्याची माहिती आ. देशमुख यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!